ज्याेतिष भविष्यच्या अ‍ॅप कंपन्या मालामाल बनल्या

    07-Jul-2025
Total Views |
 
 

app 
 
सध्या प्रत्येक गाेष्टीचे अ‍ॅप उपलब्ध झाले आहे.त्याला ज्याेतिष क्षेत्र कसे अपवाद राहणार. सध्या अनेक कंपन्यांनी या विषयावरील अ‍ॅप आणले आहे.तिथे मिनिटांवर पैसे घेतले जातात. पण, काेणतीच जबाबदारी कंपनी घेत नाही.साेशल प्लॅटफाॅर्मवर पैसे उकळण्याच्या पद्धती ‘अभिनंदन! तुम्हाला विनामूल्य संवाद करण्याची संधी मिळाली आहे.’ एका व्यक्तीने एका ज्याेतिष अ‍ॅपवर साइनअप केल्यावर स्क्रीनवर हा संदेश आला. स्क्रीनवर चमचमता पिवळ्या रंगाचा गाेलाकार मंच सजलेला हाेता. त्यावर पश्चिमी पाेशाखात लाेक बसलेले हाेते. हातातील हँडसेट, लॅपटाॅपवर तल्लीन हाेते. सगळ्यात खाली एका बटणावर लिहलेले हाेते, ‘माेफत चॅट सुरू करा.’ त्यावर ्निलक केल्यावर ज्याेतिषाबराेबर टे्निस्टंग विंडाे ओपन हाेते. तिथे दाेन मिनिटांचे काउंटडाऊन टाइमर असताे. तिथे प्रश्न विचारले जातात आणि उत्तर येते.
 
पण, उत्तर लगेच येत नाही. उदा. तुम्ही जर करिअरविषयी प्रश्न विचारला तर ज्याेतिष थेट उत्तर देत नाही. पण, त्यासंबंधी इतर प्रश्न विचारत राहतात आणि दाेन मिनिटाची वेळ संपू लागते. मग, तिकडून संदेश येताे, तुमची कुंडली खूप चांगली आहे. कृपया परत रिचार्ज करा, म्हणजे मी तुमची मदत करू शकेन.आता अतिरिक्त सहा मिनिटे खरेदी करण्यासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागते. म्हणजे एका कंपनीने त्या व्यक्तीला पैसे भरणारे ग्राहक बनविले आहे.हे उदाहरण आहे, ज्याेतिषी सायबर साेशल प्लॅटफाॅर्मवर कसे पैसे कमवत आहेत याचे.साहजिकच ज्याेतिषाबराेबर जित्नया जास्त वेळ बाेलाल, तितके रिचार्ज करावे लागणार आणि ज्याेतिषी तितके पैसे कमवत राहणार.परंपरागत समाजात ज्याेतिषाचे मानाचे स्थान ज्याेतिषी वैदिक काळापासून भारतीय समाजाचे अभिन्न अंग बनलेले आहेत.
 
समाजात त्यांना माेठे मानाचे स्थान मिळाले आहे. भारतीय घरांमध्ये ज्याेतिषांना विचारून निर्णय घेण्याची प्रथा आहे.
काेणाबराेबर लग्न करायचे, कधी आणि कसे करायचे, कधी नवीन काम सुरू करावे, कधी गृहप्रवेश करावा हे सगळे ज्याेतिषीच सांगतात.लहान मुलांचे नाव देखील ते सांगतात.सल्लागाराचे काम ज्याेतिषी ग्रहांच्या स्थिती आणि चाल यावर आधारित सल्ला देतात. विभिन्न ग्रह, देवतांना प्रसन्न करण्यासाठी पूजा करतात. ते सकारात्मक प्रभाव वाढण्यासाठी आणि नकारात्मक प्रभाव नष्ट हाेण्यासाठी रत्न घालण्यासारखे उपाय सुचवितात. जगण्याविषयी भविष्यवाणी करण्याच्या पलीकडे जाऊन ते नेहमी सल्लागाराच्या रूपात काम करतात. अडचणीच्या काळात लाेक जेव्हा ज्याेतिषांशी संपर्क करतात, तेव्हा ज्याेतिषी त्यांच्या आशा जगविण्याचे काम करतात.
 
लाेकांच्या विश्वासाचा कंपन्यांना फायदा ज्याेतिषांवर लाेकांचा विश्वास हा साेन्याच्या खाणीसारखा आहे. ज्याेतिषी सेवा देणाऱ्या कंपन्या या विश्वासामुळे कमाई करतात.एका कंपनीच्या अ‍ॅपवर 41 हजारांपेक्षा अधिक ज्याेतिषी असल्याचा दावा ती कंपनी करते. तर 4 लाख 50 हजारपेक्षा अधिक दैनिक उपयाेग करणारे आणि 25 लाखांपेक्षा अधिक महिन्यातून एकदाउपयाेग करणारे आहेत, असेही कंपनी सांगते.कंपन्यांना माेठा नफा ज्याेतिषाची सेवा देणाऱ्या कंपन्या माेठे यश मिळवत आहेत. पर्याप्त नफा मिळवत आहेत. केवळ एका कंपनीचा महसूल 2023मध्ये 283 काेटी रुपयांपासून 2024मध्ये 651 काेटी रुपये झाला.याच काळात नफा 12टीपेक्षा अधिक वाढला, असे दिसून आले. इतरही अ‍ॅप कंपन्या अशा पद्धतीने नफा मिळविण्याच्या मागे लागल्या आहेत.
 
त्यासाठी कंपन्यांनी मार्केटिंगवरील खर्च दुपटीपेक्षा अधिक केला. एका कंपनीने मार्केटिंगवर वित्त वर्ष 2023मध्ये 75 काेटी रुपये खर्च केला हाेता, तर 2024मध्ये 163 काेटी रुपये खर्च केला आहे.ज्याेतिषी नाराज या कंपन्यांच्या अ‍ॅपवर असलेल्या काही ज्याेतिषांनी हे अ‍ॅप साेडले. या कंपन्याचा आर्थिक कारभार कसा चालताे, यावर त्यांनी प्रकाश टाकला.त्यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांमध्ये ज्याेतिष कंपन्यांचा जास्त जाेर हा जास्तीत जास्त वेळ ग्राहकांना अ‍ॅपवर जाेडून ठेवण्यात आहे. ग्राहक जितका जास्त वेळ सल्ला घेत राहील, कंपनीला तितकी जास्त कमाई हाेते.त्यामुळे ज्याेतिषांना ही कंपनी एका काॅलसेंटर प्रमाणे वाटते. हा आता ज्याेतिष मंच राहिला नाही, कंपनीचा पूर्ण भर ग्राहक जास्तीत जास्त वेळ अ‍ॅपवर कसा घालवेल आणि महसूल वाढत राहील, यावर असताे, असे ते खेदाने सांगतात.
 
ज्याेतिष आणि कंपन्यांची भागीदारी महसुलाची वाटणी कंपनी आणि ज्याेतिष यांच्यात समसमान हाेते. ग्राहकाने 100 रुपयांचा रिचार्ज केला तर पहिले काही पैसे साेडून नंतरच्या पैशांचे समान वाटप हाेते, असे काही ज्याेतिषांनी सांगितले. तर काही ज्याेतिषांनी सांगितले, की ज्याेतिष कंपन्या आपल्या माेठ्या विपणन खर्चाची भरपाई त्यांच्याकडूनच करतात.ग्राहकांना बाेलण्यात गुंतवून ठेवणे कंपन्या ज्याेतिषांना ग्राहकांशी 30 मिनिटांपेक्षा अधिक वेळ बाेलण्यास सांगतात. पहिल्या 30 मिनिटांसाठी 70 टक्के हिस्सा घेतात. ज्याेतिषीने सांगितले, की त्यामुळे आम्हाला त्या ग्राहकाशी 30 मिनिटांपेक्षा अधिक वेळ काढावा लागताे, त्याला तित्नया वेळ बाेलतं ठेवावं लागतं.काही ग्राहक नियमित फाेन करतात. त्यांना वफादार ग्राहक करण्यासाठी ज्याेतिषांना प्रशिक्षण देण्यात आल्याचेही एका ज्याेतिषाने सांगितले.
 
एका ज्याेतिषाने सांगितले, की अशाप्रकारे ग्राहकांना 30 मिनिटे बाेलतं ठेवणं खूप अवघड असतं. कारण, त्यालाही माहीत असते, की ताे मिनिटांनुसार पैसे भरत आहे. त्यामुळे ताे अवघड प्रश्न विचारताे. त्याला सरळ उत्तर हवे असते. पण, कंपनी ग्राहकांशी खाेटं बाेलायला लावते. त्याला गाेड गाेड बाेलून नादी लावायला सांगते.ज्याेतिष केवळ मनाेरंजन आहे का? एका कंपनीने आपल्या वेबसाइटवर घाेषणाच करून टाकली आहे, की ही सेवा केवळ मनाेरंजनाच्या उद्देशासाठी आहे आणि आम्ही भविष्यवाणीच्या सल्ल्यासाठी जबाबदार नाही.नियम नसल्याचा फायदा उठवतात कंपन्या भारतात ज्याेतिष प्लॅटफाॅर्म नियंत्रित करण्यासाठी काही नियम नाहीत. कायदे तज्ज्ञांचे मत आहे, की स्टार्टअपला सामान्यतः आयटी अ‍ॅ्नट आणि आयटीआर नियमांबराेबरच उपभाेक्ता संरक्षण (ई-काॅमर्स) नियम, 2020 चे पालन करावे लागते.
 
पण, ज्याेतिष कंपन्या मनाेरंजनाचा दावा करून, आपल्या जबाबदारीतून वाचण्याचा प्रयत्न करतात.काेर्टाने ज्याेतिषाला विज्ञानाच्या रूपात मान्यता दिली आहे.त्यामुळे असे मंच देत असलेल्या सेवांची अचूकता आणि विश्वासार्हतेसाठी उत्तरदायी आहेत. ज्याेतिष कंपन्याना सजग राहून ज्याेतिष शास्त्राचाही पूर्ण आदर करण्याची जरुरी आहे आणि या व्यवसायात चांगली कमाई करण्याच्या चांगल्या पद्धती ठेवल्या पाहिजेत. ग्राहक आणि ज्याेतिष या दाेन स्तंभावरच ज्याेतिष-व्यवसाय उभा आहे, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. आज किंवा भविष्यात या दाेघांचे नुकसान करून कंपन्या फायद्यात राहणार नाहीत आणि हे समजण्यासाठी त्यांना कुठल्या ज्याेतिषाची गरजही नाही.असंताेष आणि तक्रार ज्याेतिषाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.ज्याेतिषाच्या सल्ल्याबद्दल अनेक वेळा ग्राहकांमध्येही असंताेष असताे.
 
वडाेदरा येथील खाद्य कंपनी सलाद टाइमचे संस्थापक रुपेश मेहता यांनी सांगितले की, त्यांनी एका कंपनीच्या सेवेचा पाच वेळा वापर केला. लाेकांना जे ऐकायची इच्छा असते, तेच ज्याेतिषी सांगतात. सामान्य सल्ला देतात. चांगल्या चांगल्या गप्पा मारतात. अनुष्ठान, सेवा विकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जाताे. एकाच दिवशी दाेन वेगवेगळ्या ज्याेतिषांना एकच प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर वेगवेगळे मिळाले.आनंद आणि संताेष ज्याेतिष सेवेबद्दल सगळेच नाराज नसतात. माेठ्या प्रमाणात लाेक ज्याेतिषांचा नियमित आधार घेतात. काहींना वाटते, की ज्याेतिषी काळजी समजून घेतात आणि त्यावर ताेडगाही देतात. ज्याेतिषाबराेबर बाेलल्याने चांगले वाटते.अडचणी संपण्याची आशा निर्माण हाेते, असे सांगणारेही अनेक लाेक आहेत. त्यामुळेच अशा कंपन्यांचा व्यापार वाढत आहे.ग्राहकांना पुरेसा वेळ दिला पाहिजे लाेकांना वाटते की, त्यांना पूर्ण वेळ दिला पाहिजे.काही कंपन्यांनी माेफत चॅटचा वेळ पाच मिनिटांवरून दाेन मिनिटांवर आणला आहे. एका ज्याेतिषाने सांगितले, की ग्राहकांशी संवाद करण्यासाठी गुणवत्ता लागते.