आराेग्यासाठी अंजिराचे पाणी

    05-Jul-2025
Total Views |
 
 

food 
 
सकाळी उठल्यावर अंजिराचं पाणी प्याल तर ते आराेग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे त्वचा आणि हाडांचं आराेग्य चांगलं राहतं.
अंजीराचं पाणी विटामिन्स आणि मिनरल्सचे चांगले स्राेत आहेत. अंजिराचं पाण्यामुळे पचन चांगलं हाेतं आणि पाेट ठीक राहतं.तसेच अपचन, गॅस, सिडिटी असे त्रास दूर हाेतात. यामुळे शरीराचं वजन याेग्य राहतं.अंजिराच्या पाण्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं आणि हाडं बळकट राहतात. अंजीर नियमित खाल्ल्यास हृदय राेगात फायदेशीर आहे. पण अंजीर फळ खाण्यापेक्षा अंजिराचे पाणी पिणे जास्त फायदेशीर आहे. यामुळे डीहायड्रेशनचा त्रास हाेत नाही. अंजिरात विद्राव्य फायबर असते जे आतड्यांच्या आराेग्यासाठी उत्कृष्ट आहे.अंजिराचे पाण्यामुळे त्यात असणारे मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हीटामिन अँटीऑक्सीडेंट घटक शरीराला सहज मिळतात. हे घटक शरीराला आतून बळकट बनवत जातात.
 
अंजिराचं पाणी कसं प्यावं? अंजीराचे पाणी पिण्यासाठी 2-3 अंजीर रात्रभर भिजवावे. सकाळी उठल्यावर अंजिराच्या पाण्यात मध मिसळून प्या.हवे असल्यास उरलेले अंजीरही वापरू शकता. चेहऱ्याच्या साैंदर्यासाठी अंजिराचे पाणी वापरू शकता.
 
वजन नियंत्रित करण्यासाठी : अंजीर मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात जे पचन सुयाेग्य ठेवतात. ज्यामुळे वजन नियंत्रित व्हायला मदत हाेते. अशक्त असाल तर वजन वाढून नियंत्रित राहतं. वजन कमी करण्यासाठी डायट प्लान घेत असाल तर त्यात अंजीर आवश्यक आहेत, कारण त्यामुळे पाेट भरलेले राहते आणि भूक नियंत्रित राहते.
 
हाडं बळकट ठेवण्यासाठी : अंजिराचा पाण्यात मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, फाॅस्फरस असे पाेषक घटक असतात. हाडांच्या मजबुतीसाठी हे आवश्यक असतात. जर सांधेदुखीचा त्रास हाेत असेल तर नियमित अंजिराचे पाणी पिऊन त्रास कमी हाेईल. ऑस्टियाेपाेराेसिस त्रास सुध्दा कमी हाेईल आणि दात सुंदर व बळकट हाेतील.
 
हाय ब्लड प्रेशर मध्ये उपयुक्त : हाय ब्लड प्रेशरमुळे हार्ट स्ट्राेकचा धाेका असताे.शरीरात साेडियम कमी झाल्याने हा त्रास सुरू हाेताे. अंजिराचे पाणी नियमित पिल्याने हाय ब्लड प्रेशर कमी हाेताे, कारण या पाण्यात पाेटॅशियम, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, फाॅस्फरस असे घटक असतात. अंजिर साेबतच आहारात हिरव्या पाले भाज्या खायला हव्यात.
 
पचन चांगले राहते : निराेगी राहण्यासाठी पचन चांगले असणे आवश्यक आहे. अंजिराचं पाणी प्यायल्याने त्यामधील विद्राव्य फायबर आतड्यांसाठी आवश्यक असतं. आतडीच्या आराेग्याचा संबंध चांगल्या पचनाशी असताे