ओशाे - गीता-दर्शन

05 Jul 2025 16:49:05
 
 

Osho 
 
आपण ढाेबळपणे दाेन-तीन विभाग करू शकताे. एक तर जे लाेक विचारात जगतात, बुद्धीने जगत असतात त्यांचा आणि दुसरा जे लाेक वासनेत जगतात, वृत्तीप्रधान असतात त्यांचा आणि या दाेन्हाेंच्या मध्येच एक विरळसा वर्ग आहे, जे भावामध्ये जगतात, भावनाप्रधान असतात त्यांचा. हे तीन ढाेबळ वर्ग आहेत. या तिहींच्यासाठी प्रक्रिया वेगवेगळ्या आहेत आणि शंभरापैकी किमान नव्याण्णव माणसे वासनेत जगतात. ही अधिकतम माणसे वृत्तीप्रधान असतात. त्यांच्यासाठी हे सूत्र आहे की त्यांनी दाेन वासनांमध्ये, दाेन वृत्तींमध्ये सम व्हावे.शंभरापैकी फक्त अर्धाच टक्का लाेक विचारात जगतात. त्यांच्यासाठी हे सूत्र आहे की, त्ंयानी विचारांबद्दल सजग व्हावे आणि अर्धा टक्का लाेक, म्हणजे ारच कमी लाेक भावनाप्रधान असतात.
 
भावांमध्ये जगतात. त्यांच्यासाठी हे सूत्र आहे की, त्यांनी भावाबाबत स्मरण राखावे, भावांचे भान ठेवावे. या तिन्हीत थाेडेथाेडे फरक आहेत, ते असे -विचारापासून ज्याला निर्विचाराकडे जायचे आहे त्याच्यासाठी अवेअरनेस विचारांबद्दल जागरूकता.भावांपासून ज्याला निर्भावाप्रत जायचे आहे.त्याच्याबाबत भावांबद्दल माईंडुलनेस स्मृती, जागेपण यात थाेडा फरक आहे. जागरूकता व स्मृती यात थाेडासा फरक आहे.आणि ज्यांना वृत्तींपासून परावृत्त व्हायचे आहे त्यांच्यासाठी समत्व-समबुद्धी द्वंद्वाच्या बराेबर म ध्यभागी थांबणे, हे सूत्र आहे.मधले जे लाेक आहेत, भावनाप्रधान त्यांच्यासाठी आणखी एक दाेन शब्द सांगताे. हे लाेक वासनेतही जगत नसतात आणि विचारातही जगत नसतात. हे भावनेत जगत असतात. यांच्यासाठी प्रयाेगशाळेचा ारसा अर्थ नसताे.
Powered By Sangraha 9.0