निवृत्त कर्मचाऱ्यांचा नवी मुंबई महापालिकेकडून सन्मान

05 Jul 2025 16:58:24
 
 

Mumbai 
 
 
नवी मुंबई महापालिकेच्या सेवेतून निवृत्त हाेणारे 12 अधिकारी, कर्मचाऱ्यांचा महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात झालेल्या समारंभात महापालिका सचिव चित्रा बाविस्कर व अतिक्रमण विभागाचे उपायु्नत डाॅ. कैलास गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला. यावेळी अधिकारी, कर्मचारी; तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित हाेते. चित्रा बाविस्कर यांनी जीवनाचे सार सांगणारी कविता यावेळी सादर केली; तसेच निवृत्त हाेणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांसमवेत काम करतानाचे अनुभव सांगत या सर्वांना शुभेच्छा दिल्या. डाॅ. गायकवाड यांनीही सेवानिवृत्तांना शुभेच्छा दिल्या. महापालिका सेवेतून निवृत्त हाेणारे भांडार विभागाचे उपायु्नत शंकर खाडे, अधीक्षक-वसुली अधिकारी कुंदा तरे, लेखा अधिकारी गीता पालव, मुख्याध्यापक मीनाक्षी पुरकर, प्राथमिक शिक्षिका सुरेखा सुरवसे, स्टाफ नर्स/ नर्स मिडवाइफ अनुजा देशमुख, वरिष्ठ लिपिक-कर निरीक्षक गणेश पाटील, वाहनचालक प्रकाश भाेईर, मीटर वाचक अनिल पाटील, कक्षसेविका मालन पवार, सफाई कामगार बाळू शिरसाट व भगवान सुरडकर या अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0