पुणे, 4 जुलै (आ.प्र.) :
मुळशी तालुक्यातील निवे मोहरी येथील जिजाबाई दगडू गाऊडसे (वय 88) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. वृत्तपत्र विक्रेते व भुसारी कॉलनी विभागाचे सदस्य मारुती गाऊडसे हे त्यांचे पुत्र आहेत.