पावसाळी उकाडा वाढवताे श्वासाच्या समस्या

05 Jul 2025 16:53:22
 
 

Health 
 
हिवाळ्यापेक्षा वेगळी समस्या हिवाळ्यात श्वास घेण्यास त्रास हाेताे.फाॅग आणि स्माॅग याचे कारण असते. पण पावसाळ्यात धूळ आणि अ‍ॅलर्जी याचे मुख्य कारण बनते. साेबतच हवेतील पाण्यामुळे धूळकण खाली येतात व श्वसनावर परिणाम करतात. यामुळे आपल्या फुफ्फुसांना जादा श्रम करावे लागतात. ज्यामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास हाेताे.फुफ्फुसे याेग्य प्रकारे काम करीत नसल्यामुळे ऑ्नसीजन आपल्या रक्तात याेग्यप्रकारे पाेहाेचू शकत नाही. ज्यामुळे अशी समस्या हाेते. माेसमाचे बदलते रूपही श्वासाच्या राेग्यांसाठी भारी पडते. बदलता माेसम आणि उकाड्यामुळे श्वासनलिकेवर खूप खाेल परिणाम हाेताे. अशावेळी जे दीर्घकाळ उकाड्यात राहतात त्यांना अस्थमाचा अ‍ॅटॅक येऊ शकताे.वाढते प्रदूषण जबाबदार धूर व सत वाढते प्रदूषण श्वसनाच्या काेणत्याही आजाराचे मुख्य कारण आहे. बऱ्याचदा आपण कळत-नकळत अशा प्रदूषित क्षेत्रात जात-येत राहताे जिथे धूर हाेत असताे. 
 
हाच धूर जेव्हा आपल्या शरीरात जाताे तेव्हा श्वासाच्या समस्या वाढतात. यासाठी श्वासाच्या रुग्णाीं धुरापासून दूर राहायला हवे आणि आजुबाजूला पूर्ण स्वच्छता राखायला हवी.हाेऊ शकते अ‍ॅलर्जी अनेकांची राेगप्रतिकारप्रणाली नाजुक असते, ज्यामुळे त्यांना प्रदूषण, धूळ, माती, बुरशी आणि प्राण्यांचे केस इ.मुळे अ‍ॅलर्जी राहू लागते. अशा लाेकांना या अ‍ॅलर्जनच्या संपर्कात आल्यामुळे व माेसम बदलल्यामुळे अ‍ॅलर्जीचा अ‍ॅटॅक येऊ लागताे. श्वास घेण्यास त्रास हाेताे. छातीत काेंडल्यासारखे हाेते. दम लागू लागताे. अशावेळी डाॅ्नटरांशी संपर्क साधणे आवश्यक हाेते.टेस्टद्वारे डाॅ्नटर अ‍ॅलर्जीचे कारक शाेधतात आणि उपचाराने पीडित व्यक्तीला बरे करतात.काेणाला हाेते जास्त समस्या ज्यांच्या छातीत सतत इन्फे्नशन राहते त्यांना धूळ व उकाड्याने खूप त्रास हाेताे. बाँक्रायटिस आणि अस्थमाच्या रुग्णांमध्येही या माेसमात समस्या वाढू शकतात. याशिवाय हायपरटेंशनचे रुग्णही सहज शिकार हाेतात.
Powered By Sangraha 9.0