आपल्याला असंतुष्ट याचा अर्थ माहीत आहे का? ताे समजणे अत्यंत कठिण आहे कारण आपल्यापैकी बहुतेकजण असंताेष इतर दिशेकडे वळवतात आणि याला कुंठित करतात. आपण फक्त काेणत्याही प्रकारे स्वत:ला सुरक्षित करावे, आपल्याला लाभ व मान मिळावा आणि आपल्याला राग येऊ नये एवढेच इच्छित असताे. आपल्या घरात आणि वातावरणातही हेच हाेत असते. लाेक स्वत: क्षुब्ध हाेऊ इच्छित नसतात यामुळेच ते आपल्या जुन्या मार्गाने जाणे पसंत करतात. कारण जेव्हा काेणी असंतुष्ट हाेते तेव्हा ते नवा शाेध सुरू करतात. प्रश्न विचारू लागतात. त्यामुळेच ते क्षुब्ध हाेतात. पण हा असंताेषच एकमेव असा भाव आहे ज्या माध्यमाने आपल्यात सहज स्फूर्ती मिळवताे.स्फूर्ती म्हणजे काय आपल्याला माहीत आहे का? प्रेरणा कशी असते? जेव्हा सृजन वा एखाद्या गाेष्टीची सुरुवात आपण स्वत: करता वा इतरांनी न सांगताही एखादे कृत्य करता तेव्हा आपण समजावे की, आपल्यामध्ये स्फूर्ती आहे. ते काम अतिमहान वा विलक्षणच असावे असेही काही नाही. ती तर नंतरची गाेष्ट आहे.
परंतु स्फूर्तीची ठिणगी तिथे तेव्हा असते जेव्हा आपल्या मनात आपण वृक्षाराेपण करता. जेव्हा आपण सहजतेने दयाळू हाेता. जेव्हा आपण एखाद्या जड ओझे घेऊन जाणाऱ्या माणसाचा थाेडा भार वाटून घेता. जेव्हा आपण रस्त्यात पडलेला दगड बाजूला नेऊन टाकता वा वाटेतील एखाद्या पाळीव प्राण्याला थाेपटता. ही सारी त्या विलक्षण स्फूर्तीची सुरुवात असते जी आपल्यामध्ये व्हायला हवी. जर आपण सृजन जाणू इच्छित असाल वा सृजनशील हाेऊ इच्छित असाल तर विलक्षण स्फूर्तीची ही सुरुवात आपल्यात अवश्य असायला हवी. सृजनशीलतेची मुळे स्फूर्तीतच असतात.त्यामुळे आपण या असंताेषाने भयभीत हाेऊ नका.आपण त्याला ताेपर्यंत खाद्य पुरवत राहा जाेपर्यंत या ठिणगीची ज्वाला हाेणार नाही व आपण प्रत्येकाशी असंतुष्ट हाेणार नाही. अर्थात आपल्या कामाने, आपल्या कुटुंबाकडून, संपत्ती, प्रतिष्ठा आणि सामर्थ्य मिळवण्याच्या परंपरागत वृत्तींकडून जेणेकरून आपण खरा विचार करू शकाल आणि सत्याचा शाेध सुरू करू शकाल.