निवृत्त हाेण्यासाठी दाेन रिप्लेसमेंट पद्धती

    04-Jul-2025
Total Views |
 
 

retirment 
 
तुम्ही निवृत्त हाेण्यासाठी किती रकमेची जरूरी आहे हे अनेक गाेष्टींवर अवलंबून आहे, जसे तुम्हाला पेंशन आणि साेशल सिक्युरिटी स्कीम्समधून किती रक्कम मिळते, अन्य काही आवकचे स्राेत आहेत का, अंदाजित मासिक खर्च आणि अन्य काही वित्तीय लक्ष्य असेल तर ते, निवृत्त हाेण्यासाठी किती वेळ बाकी आहे, आणि लाईफ इक्स्पेक्टंसी. तसेच निवृत्त झाल्यानंतर काेणत्या प्रकारची जीवनशैली असणार आहे, हे महत्त्वाचे आहे.सध्या तुमची जीवनशैली आहे, तीच निवृत्तीनंतर असेल, की थाेडी चांगली असेल की थाेडी साधी असेल. ह्या सर्व गाेष्टी तुमच्या निवृत्तीच्या रकमेवर परिणाम करते.काही गाेष्टी तुमच्यापाशी शेअर करताे.
 
लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या ग्राहकांच्या निवृत्तीसाठीच्या रकमेचा अंदाज लावण्याचा मुद्दा येताे, त्यावेळी सगळे आर्थिक सल्लागार याच पद्धतीचा आधार घेतात. एक आवक रिप्लेसमेंट पद्धत आहे आणि दुसरी खर्च रिप्लेसमेंट पद्धत आहे. दाेन्ही पद्धती तुम्हाला जरूरी रकमेचा अंदाज सांगतात, पण काेणती पद्धत स्वीकारायची हे तुमच्यावर आहे. निवृत्तीच्या जवळ आलेल्या व्यक्तीसाठी, जसे पन्नाशी ओलांडलेली व्यक्ती असेल तर खर्च रिप्लेसमेंट पद्धती चा उपयाेग करता येईल. पण असे लाेक जे निवृत्तीपासून अद्याप दूर आहेत अशा व्यक्तीनी आवक रिप्लेसमेंट पद्धतीवर जास्त भर दिला पाहिजे. या पद्धतीचा उपयाेग कधी करायचा याबद्दल पाहू.
 
आवक रिप्लेसमेंट पद्धत : निवृत्तीच्या वेळी तुमची आवक जितकी असेल तेवढ्या रकमे एवढी भरपाई तुमच्या निवृत्ती फंडातून मिळवू शकता एवढा फंड जमा करायचा हा आवक रिप्लेसमेंट पद्धतीमागचा विचार आहे. अर्थात ही पद्धत खर्च विचारात घेत नाही, ही त्यातील एक माेठी उणीव आहे. तसेच, कमी वयात निवृत्ती दरम्यान हाेणाऱ्या संभाव्य खर्चाचा अंदाज करणे अवघड असल्यामुळे, रिटायरमेंट प्लॅनर्स या पद्धतीचा उपयाेग तीस किंवा चाळीशीच्या दरम्यान असतील अशा व्यक्तीसाठी करतात.
 
खर्च रिप्लेसमेंट पद्धत : तुम्ही जर वयाची पन्नाशी ओलांडली असेल तर तुमच्या निवृत्ती फंडासाठी आवश्यक असलेल्या रकमेचा अंदाज करण्यासाठी ‘खर्च रिप्लेसमेंट पद्धती’ चा उपयाेग करण्याचा सल्ला दिला जाताे. या पद्धतीनुसार, तुमच्या निवृत्तीच्या वेळी जाे खर्च हाेऊ शकताे, त्याचा अंदाज करण्याची आवश्यकता आहे. ही पद्धत ज्यांची निवृत्ती जवळ आली आहे अशा लाेकांसाठी उपयाेगी आहे. त्यांना सध्याचा व निवृत्तीनंतरच्या खर्चाचा अंदाज करता येताे.
 
आता मी निवृत्ती फंडाच्या आवश्यकतेचा अंदाज कसा करायचा याबद्दल पाहू या, तेव्हा मला वाटते तुम्ही सर्वांनी एक गाेष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, तुम्ही स्वत:ला विचारा, खराेखर किती रक्कम पुरेशी आहे? बऱ्याच वेळा हे समजून घेतले पाहिजे की, पैसा हे अंतिम लक्ष्य नाही, तर आनंद आहे. माझा म्हणण्याचा हा अर्थ नव्हे, की पैशाला महत्त्व नाही, पैसा महत्त्वाचा आहेच. आपण अगदीच संन्याशासारखे तर राहणार नाही. तरीसुद्धा पैसा ही एकमेव गाेष्ट नाही. तुमच्या जीवनात फक्त पैशासाठी धावपळ करण्याऐवजी, तुम्ही आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न कराल, तर कसे वाटेल? त्यामुळे याेग्य खर्च करण्याचा विचार करा. भाैतिक वस्तूंवर खर्च करण्याऐवजी अनुभव मिळवण्यासाठी खर्च करण्याचा प्रयत्न करून तुमच्या सुखाचा स्तर उंचवण्याचाही विचार करा.