सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या : तसे तर सर्वांनीच सकाळी लवकर उठणे लाभदायक असते पण आपण जर विद्यार्थी असाल तर आपण सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्यायला हवी. कारण सकाळच्या वातावरणात खूप ऊर्जा व सकारात्मकता असते. तसेच मेंदू पूर्णपणे फ्रेश हाेताे. एवढेच नव्हे तर अभ्यास करताना अत्यंत कठिण प्रश्नही सहजतेने साेडवता येऊ शकताे. त्यासाठी रात्री लवकर झाेपायला हवे कारण शारीरिक व मानसिक आराेग्यासाठी 7-8 तास झाेप हवी असते.
राेज वाचन करण्याची सवय : नियमितपणे वाचण्याची सवय ठेवा व आपली सारी कामे वेळेत करण्याचा प्रयत्न करा. यामुळे ज्ञान वाढेल व आपण एक उत्तम विद्यार्थी बनू शकाल. विद्यार्थी जीवनातील ज्ञान भविष्यातील अनेक अडथळे ओलांडण्यास मदत करते.
उत्तम दृष्टिकाेनासाेबत स्वत:ला प्रेरित करा : नेहमी आपले विचार व दृष्टिकाेन चांगला ठेवा. स्वत:ला पुढे जाण्यासाठी सतत प्रेरित करीत राहा. हे विद्यार्थी जीवनात अत्यंत गरजेचे असते.
अभ्यासाची वेळ ठरवा : एका विद्यार्थ्यासाठी अभ्यासाची वेळ ठरवणे अत्यंत आवश्यक असते जेणेकरून खेळ व मनाेरंजनासाेबत अभ्यासात काेणताही अडथळा येणार नाही. यामुळे नियमित अभ्यासाची सवय जडते.
खाण्या-पिण्याकडेही विशेष लक्ष द्या : विद्यार्थ्यासाठी इतर गाेष्टींसाेबतच आवश्यक आहे सकस आणि पाैष्टिक आहार. ताे मर्यादित प्रमाणात घेतल्यास अभ्यास करताना आळस येणार नाही. नियमित पाैष्टिक आहार घेतल्यामुळे मेंदू तर तल्लख हाेताेच तसेच अभ्यासातही मन लागते.
अभ्यास करताना लक्ष केंद्रित ठेवा : अभ्यास करताना विद्यार्थ्याने लक्ष केंद्रित करायला हवे. लक्ष केंद्रित केल्यामुळे अभ्यास उत्तम कराल व गाेष्टी सहजतेने शिकू शकाल. यामुळे मन केंद्रित ठेवण्याचे काैशल्य विकसित हाेऊन आपली इच्छा व इंद्रियेही ताब्यात ठेवू शकाल.
आनंदी राहण्याची सवय चांगली : वेळ कशीही असाे जीवनात प्रत्येक टप्प्यावर आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आनंदी राहिल्यामुळे अभ्यासात तर मन लावू शकाल शिवाय तुमचे इतरांशीही चांगले संबंघ राहतील. जी माणसे सतत चेहरा पाडून राहतात त्यांच्याशी काेणीही बाेलू इच्छित नसते. तसेच तुम्ही इतरांना भेटल्यावर त्यांच्यावरही सकारात्मक परिणाम हाेईल. यासाठी स्वत:ही आनंदी राहा व इतरांनाही खुश ठेवा.