चक्कर येणे यावर करावेत घरगुती उपचार

    04-Jul-2025
Total Views |
 
 

Health 
 
=डाेक्यात सर्दी साठून म्हणजे डाेके जड हाेऊन चक्कर येत असली तर सुंठीचे बारीक चूर्ण तपकिरीप्रमाणे नाकाद्वारा ओढल्याने बरे वाटते.
=रक्तातील साखर कमी झाल्याने चक्कर आली असता पटकन साखर-पाणी देण्याचा उपयाेग हाेताे.
=भूक लागली असूनही बराच वेळ काही खाणे झाले नाही तरी चक्कर येऊ शकते. असा वेळी साळीच्या लाह्या, दूध, साखर असे मिश्रण खाण्याने लगेच बरे वाटते.
= गाडी लागल्यामुळे चक्कर येण्याची सवय असणाऱ्यांना प्रवासाच्या आधी व प्रवासात थाेड्या थाेड्या वेळाने साळीच्या लाह्या खाण्याचा उपयाेग हाेताना दिसताे.
=विरळ हवेच्या उंच ठिकाणी जाताना सुती कापडात कापूर, वेलची, ओवा, वेखंड यांच्या पुरचुंडीचा अधूनमधून वास घेण्याने चक्कर येण्यास प्रतिबंध हाेऊ शकताे.