पेड्राे काॅलिन्स हा वेस्ट इंडीजचा खतरनाक गाेलंदाज.डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट काढण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरला सतावू शकलेल्या माेजक्या गाेलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे. पेड्राेच्या एका स्पेलमधली गंमत सचिनने विक्रम साठेच्या पाॅडकास्टवर सांगितली आहे.पेड्राे मिडल स्टंपात बाॅल टाकायचा, ताे सचिन आरामात साेडायचा. फलंदाजाला मधल्या स्टंपात टाकलेला बाॅल खेळायलाच हवा असं वाटतं, त्याला ताे बॅट लावायला जाताे, बाॅल बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये जाताे आणि फलंदाज झेलबाद हाेताे. सुनील गावसकरांसारखा दिग्गज खेळाडूही या ट्रॅपमध्ये अडकायचा.
सचिनही अडकायचा. आपण तसाच बाॅल टाकताे आहाेत आणि सचिन ताे आरामात साेडताे आहे, हे कसं घडतंय ते पेड्राेच्या लक्षात येईना. पेड्राे धावायचा तेव्हा चेंडूची चमकदार बाजू ताे लपवू शकायचा नाही. ती काेणत्या दिशेला आहे, ते पाहिल्यावर बाॅल कुठे वळणार आहे ते सचिनला कळायचं. हे पेड्राेच्या लक्षात आल्यावर त्याने ओव्हर द विकेट बाेलिंग करण्याचा निर्णय घेतला. ताे अंपायरच्या मागून धावत यायला लागला. ताे आला की सचिन क्रीझबाहेर जायचा. बाेलर दिसतच नाही धावताना तर फलंदाज स्टान्स कसा घेणार? त्याने अंपायरला थाेडं जास्त वाकायला लावलं, मग पेड्राे दिसू लागला, काम साेपं झालं!