एक सामान्य ऊर्जा जी आपल्या अहंकाराला आधार देते ताे टिकून राहण्यासाठी कारणे उपलब्ध करते आणि भ्रामक लक्ष्य आपल्यासमाेर ठेवते. दुसरी दिव्य ऊर्जा अहंकार नष्ट करते, हलका करते. ती जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा ढंगदेते.आपल्यामध्ये तीन केंद्र असतात, ज्यांचे आपल्याला सामंजस्य करावयाचे असते.हे तीन केंद्र आहेत -शरीर, भाव आणि बुद्धी. जेव्हा हे तिन्ही केंद्र तुमच्या दैनंदिन जीवनात एकत्र कर्मरत हाेतील तेव्हा एक दैवी ऊर्जा प्रवाहित हाेईल. जेव्हा तुम्ही सुखात आरामात असता तेव्हा तुमच्या शरीरात आराेग्यदायी रसायनांची उत्पत्ती हाेत असते. याउलट तणावात राेगट घटक शरीरात पसरू लागतात. यासाठी आरामात समाधानात राहा. एक उदाहरण पाहा- चारजण एका विमानात बसले हाेते. एक पायलट, एक राजकीय पुढारी, एक शिक्षक आणि एक विद्यार्थी. मध्येच हवेत पायलटने सांगितले की, ‘विमानात काही बिघाड आहे आणि आपल्याकडे फक्त तीन पॅराशूट आहे आणि मी एक महत्त्वाचा माणूस आहे.’ असे म्हणून त्याने एक पॅराशूट घेतले व उडी मारली.
राजकीय पुढाऱ्याने ते ऐकताच ‘मीही महत्त्वाचा आहे’ असे सांगत दुसरे पॅराशूट उचलून उडी मारली. शिक्षक विद्यार्थ्याला म्हणाला, ‘ मी तर माझे जीवन जगलाे आहे. त्यामुळे तू हे अखेरचे पॅराशूट घे आणि स्वत:चा जीव वाचव.’ विद्यार्थी म्हणाला, ‘गुरूजी इथे अद्यापही दाेन पॅराशूट आहेत आणि आपण दाेघेही वाचूशकताे.’ शिक्षकांनी चकित हाेत विचारले, ‘ असे कसे हाेऊ शकते. दाेघांनी तर आधीच उडी मारली आहे.’ विद्यार्थ्याने उत्तर दिले, ’ गुरुजी, पुढाऱ्याला खूपच घाई हाेती. त्यामुळे त्यांनी माझी स्कूलबॅग उचलूनच उडी मारली.’ जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा तुमच्यावर काेणताही परिणाम न करणारी अनेक कारणे प्रकट हाेतात. त्यामुळे प्रत्येक काम करताना आपले शरीर शांत ठेवायला शिका. आपल्या सर्व भावनांमध्ये प्रेम आणि दयाळूपणा मिसळायला शिका. एक प्रवाही ऊर्जा तुमच्यामध्ये राहावी. आपल्या प्रत्येक कामात ती ऊर्जा आणा.