रामायणात लक्ष्मण इंद्रजिताच्या बाणाने मूर्च्छित हाेताे. श्रीराम अत्यंत दु:खी मनाने लक्ष्मणाचं डाेकं आपल्या मांडीवर घेऊन बसतात. त्यावेळी बिभिषणाने सांगितलेली संजीवनी जडीबुटी आणण्यासाठी गेलेले महाबली हनुमान थेट ताे डाेंगरच उचलून आणतात. उपचार झाल्यावर हा डाेंगर पन्हा जिथल्या तिथे ठेवून येण्यासाठी हनुमान पुन्हा निघतात. पण, नेमका कुठून हा डाेंगर उचलला आहे, हे न समजल्याने ताे हा डाेंगर एका माेकळ्या ठिकाणी ठेवून परततात.हा डाेंगर म्हणजे ठाणे जिल्ह्यातला प्रसिद्ध तुंगारेश्वर आहे, असे काही इतिहासकार आणि धर्मवाद्यांचं म्हणणे आहे. या डाेंगरावर संजीवनी जडीबुटी आजही असल्याचा दावाही त्यांनी केला आहे