पावसाळ्याला साजेसे असे कपडे आणि अॅक्सेसरीज तरुणींना देतात अनाेखी शैली! पावसाळा आला म्हणजे फॅशनेबल तरुणी काळजीत पडतात की, आता स्टायलिश किंवा डिझाइनर कपडे कसे काय घालावेत? सामन्यात: आपल्या मनात ही गाेष्ट घर करून बसलेली असते की, पावसाळ्यात डिझाइनर पाेशाख/ कपडे घालता येत नाहीत किंवा घालायला मिळणार नाहीत. या ऋतूत जुने झालेले कपडे घालून ऋतुकाळ पूर्ण करावा किंवा भिजले तरी लगेचच सुकून जातील असे कपडे घालावेत. आजही असा विचार करणारा माेठा वर्ग आहे की पावसाळ्यात नवीन कपडे घेऊच नयेत. परंतु, हल्ली अशी समजूत आऊट-डेटेड हाेत चालली आहे. आजच्या तारखेला बाजारात पावसाळ्यात घालता येतील असे कपडे आणि त्या बराेबर वापरात आणता येतील अशा पुष्कळ अॅक्सेसेरीझ उपलब्ध आहेत.
फॅशन निष्णांत याविषयी माहिती देताना म्हणतात की, पाऊस काेसळत असेल तर शाॅर्ट्स आणि स्कर्ट्स आरामदायक आणि स्टायलिश विकल्प आहे. शाॅर्ट्स आणि स्कर्ट्स, टँक टाॅप किंवा ढिल्ला - टी शर्ट बराेबर फार आकर्षक दिसतात. या ड्रेसबराेबर पावसाळ्यात चालू शकतील अशा चपला घालाव्यात.ज्या युवतींना शाॅर्ट्स किंवा स्कर्ट्स घालायला संकाेच वाटत असेल, त्यांना नी लेन्ग्थ्स रॅम्पर्स घालता येईल.याशिवाय, हा ड्रेस प्रवास करताना खूप सुविधाजनक असताे आणि आकर्षक लूक देताे. या सीझनमध्ये काॅलेजकन्या गुडघ्यांपर्यंत लांबी असलेल्या टाईट डेनिम घालणे देखील पसंत करतात.अशा डेनिम टीशर्टबराेबर छान दिसतात.
मात्र विवाहित महिला असा ड्रेस घालण्याचे टाळतात. ज्या स्त्रिया फक्तपरंपरागत कपडे घालण्याचा आग्रह धरतात, त्यांनी पावसाळ्यात सिन्थेटिक मटेरियलचे, तसेच गडद रंगांचे कपडे घातले पाहिजेत. पावसाळ्यात फिक्कट रंगांचे कपडे भिजून शरीराला चिकटतात, तेव्हा त्यांतून अंतर्वस्त्रेही दिसू लागतात.गडद रंग स्टायलिश देखील वाटतात आणि भिजलेल्या अंगांचे दर्शनही करवून देत नाहीत. याशिवाय पावसाळ्यात जाॅर्जे ट आणि शिफाॅन फॅब्रिक स्टाइल स्टेटमेंट बनून राहतात. ही दाेन्ही फॅब्रिक हलकी असल्याने लवकर सुकली जातात.या ऋतूमध्ये काॅलेजकन्या वन पीस ड्रेससुद्धा फार पसंत करतात. अशा कपड्यांबराेबर तुम्ही त्यांच्या रंगांच्या विरुद्ध रंगांचे शूज-हॅन्डबॅग-छत्री घेऊन स्टायलिश दिसू शकाल. तुम्हाला वाटल्यास या पाेशाखाबराेबर स्कार्फचा वापरही करू शकता.
स्कार्फमुळे तुम्ही केवळ स्टायलिशच दिसत नाहीत, परंतु अचानक पाऊस पडल्यास तुम्ही त्याने डाेकेही झाकू शकता.अजूनपर्यंत तरुणी रेनकाेट वापरण्याचे टाळत असे. याचे कारण हे आहे की त्याच्यामुळे त्यांचा स्टायलिश लूक मारला जात असे. पण हल्ली फॅशनेबल तरुणी आकर्षक दिसण्यासाठी क्लासी ट्रेंच काेट घालू लागल्या आहेत. ट्रेंच काेट्स फारच आकर्षक रंगांत मिळतात.शिवाय ते तुम्हाला भारदस्त लूक देतात ते वेगळं! पावसाळ्यासाठी स्टायलिश ड्रेसप्रमाणे आता अनेक प्रकारचे आकर्षक अॅक्सेसेरीझ सुद्धा मिळतात. जसे की कलरफुल बेलरिना (एक प्रकारची छत्री).या सीझनमध्ये पायांना स्वच्छ ठेवणे आणि ते आकर्षक दिसण्याकरिता रंगबेरंगी बेलरिना किंवा फ्लिपफ्लाेप वापरावेत. या शिवाय नियाॅन रंगात मिळणाऱ्या छत्र्यांही आकर्षक दिसतात.