भर पावसात दीड कि.मी. विजेचा खांब वाहून नेला

    29-Jul-2025
Total Views |
 
 

light 
 
पिकांचे नुकसान टाळत भर पावसात दीड कि.मी. अंतरावर विजेचा लाेखंडी खांब कामगारांनी वाहून नेत पाच दिवसांपासून खंडित असलेला वीजपुरवठा महावितरणने रविवारी दुपारी सुरळीत केला. राजगड (वेल्हे) तालुक्यातील वेल्हा बुद्रुक गावातील 55 ग्राहकांचा वीजपुरवठा खांब तुटल्यामुळे खंडित झाला हाेता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी स्थानिक ग्राहकांचा पाठपुरावा सुरू हाेता; परंतु काम अवघड हाेते.त्यामुळे अग्रवाल या ठेकेदार एजन्सीची मदत घेण्यात आली. संततधार वाऱ्यामुळे काम करणे अवघड हाेते. मात्र, कामगारांनी लाेखंडी खांब अंगाखांद्यावर वाहून नेला. ताे उभा करताना भातपिकांचे नुकसान हाेणार नाही याची काळजी घेतली. खांब उभा करून तारा ओढून घेतल्यावर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. याबाबत ग्रामस्थांनी महावितरण व ठेकेदार कामगारांचे काैतुक केले. महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंता युवराज जरग, मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता देविदास बैकर, नसरापूरचे उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ साेनसळे यांनीही वेल्हा शाखा अभियंता सचिन कुलकर्णी, वीज कर्मचारी व ठेकेदार अग्रवाल इलेक्ट्रिकल्सचे काैतुक केले आहे.