जाम घरच्या घरी

29 Jul 2025 22:53:22
 

Jam 
1 मिक्स  जाम : 250 ग्रॅम स्ट्राॅबेरी, बिया काढलेली काळी द्राक्षे 300 ग्रॅम, 200 ग्रॅम अननस व मध्यम आकाराचे एक हिरवे व एक लाल सफरचंद घ्या. सफरचंदाव्यतिरिक्त सर्व फळे लहान तुकड्यांमध्ये कापून मिक्सीत बारीक करून घ्या. दाेन्ही सफरचंद साेलून कुस्करून घ्या.पॅनमध्ये कुस्करलेले सफरचंद टाकून मंद जाळावर ठेवा. आता त्यात 500-600 ग्रॅम साखर टाका. हा जाम बनवण्यासाठी बारीक केलेली फळे पॅनमध्ये टाकून व्यवस्थित हलवा. पॅनमध्ये 3-4 वेलदाेड्यांची पावडर व दालचिनीचा एक तुकडा टाका. मघ्यम जाळावर घट्ट हाेईपर्यंत शिजवा. शिजल्यानंतर थंड करून एक लिंबाचा रस मिसळा. जाम हवाबंद डब्यात ठेवून वापरा.
 
2. अ‍ॅपल जाम : पॅनमध्ये 1 कप पाणी टाकून उकळा. त्यात एक माेठा चमचा लिंबाचा रस टाकून मिसळा. एक माेठ्या आकाराचेसफरचंद कुस्करून टाका. जेव्हा सफरचंद थाेडे शिजू लागेल तेव्हा त्यात 2 कप साखर टाकून मिसळा.सुरुवातीला मध्यम जाळावर शिजवा. साखर वितळू लागल्यानंतर जाळ मंद करा. 10-20 मिनिटांनंतर जेव्हा सफरचंद शिजेल तेव्हा त्यात खाण्याचा लाल रंग मिसळा (ऐच्छिक). पाणी सुकेपर्यंत ढवळा.प्लेटमध्ये अर्धा चमचा जाम टाकून प्लेट तिरकी करा. जर जाम खाली सरकत नसेल, तर ताे तयार झाला असे समजा.
Powered By Sangraha 9.0