डाॅ. गाेंदावले यांची ‘जय महाराष्ट्र’मध्ये मुलाखत

    29-Jul-2025
Total Views |
 

interview 
 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात महाराष्ट्र कृषी औद्याेगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. मंगेश गाेंदावले यांची विशेष मुलाखत प्रसारित हाेणार आहे. ही मुलाखत मंगळवारी (29 जुलै) दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रात्री 8 वाजता प्रसारित हाेईल; तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत फेसबुक, एक्स आणि यूट्यूब या समाज माध्यमांवरही पाहता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार खते, कीटकनाशके, कृषी अभियांत्रिकी उपकरणे व पशुखाद्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासन सातत्याने सकारात्मक पावले उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या या महामंडळामार्फत रासायनिक व जैविक कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके; तसेच प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक यंत्रसामग्री शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. या माध्यमातून शेती अधिक उत्पादनक्षम हाेण्यास हातभार लागणार आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या याेजना, उपक्रम व महामंडळाची कार्यपद्धती याविषयी डाॅ. गाेंदावले यांनी या कार्यक्रमात संवाद साधला आहे.