पावसाळ्यातील बदलत्या वातावरणामुळे पाठदुखी आणि सांधे कडक हाेणे यासारख्या तक्रारींमध्येही वाढ हाेते. अनेक लाेकांना असे लक्षात येते, की पावसाळ्याच्या दिवसात, विशेषतः पहाटे किंवा रात्रीच्या वेळी पाठदुखीची तीव्रता वाढते. नकाे असलेल्या पाठदुखीमुळे दैनंदिन दिनचर्येवरही त्याचा परिणाम हाेताे. हे सर्वांनाच माहीत आहे, की पावसाळ्यात आर्द्रता वाढून वातावरणाचा दाब कमी हाेताे आणि मणक्यांसंबंधी तक्रारी डाेकं वर काढू लागतात.पाठीच्या समस्या, दुखापती, संधिवात किंवा बैठी जीवनशैलीचा इतिहास असलेल्यांनी विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे. हवेतील आर्द्रतेमुळे शरीरातील स्नायू आणि अस्थिबंधनांसह मऊ ऊतींना सूज येते.यामुळे पाठीचा कणा आणि पाठीच्या खालच्या भागात कडकपणा येऊन हालचाली मंद हाेऊ शकतात.
स्लिप डिस्क, सायटिका किंवा ऑस्टियाे आर्थरायटिस सारख्या पाठीच्या आजार असलेल्या लाेकांना पावसाळी वातावरणातील दाबात बदल झाल्याने तसेच स्नायू ताठरणाऱ्या थंड हवामानामुळे तीव्र वेदना हाेऊ शकतात ज्यामुळे पाठदुखीचा त्रास हाेताे. त्याचप्रमाणे जे लाेक शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय असतात आणि घरात जास्त वेळ घालवतात त्यांना याचा त्रास अधिक जाणवताे. जास्त वेळ बसणे, घरून काम करताना चुकीची शारीरीक स्थिती बाळगणे आणि स्ट्रेचिंग किंवा हालचाल न करणे यामुळे पाठीचा कणा आणि पाठीच्या खालच्या भागात ताण येताे, ज्यामुळे वेदना आणि गतिहीनता निर्माण हाेते. दमट वातावरण आणि निसरडे रस्ते यामुळे पडणे किंवा पाठीला दुखापत हाेण्याचा धाेका देखील वाढताे.
पाठीचा कणा लवचिक ठेवण्यासाठी दरराेज व्यायाम करा, स्ट्रेचिंग करा आणि चालायला विसरू नका. तुमची पाठ सरळ आणि खांदे आरामदायी स्थितीत ठेवून बसण्याची याेग्य पद्धत वापरा. याेग्य शारीरिक स्थिती राखण्याची खात्री करा. जास्त वेळ काम करतअसल्यास पाठीला याेग्य आधार देणारी खुर्ची वापरा.स्नायूंचा कडकपणा आणि वेदना कमी करण्यासाठी दुखणाऱ्या जागी हिटिंग पॅड किंवा हाॅट काॅम्प्रेस वापरा.थंड किंवा ओल्या हवामानात वावरताना, उठताना, वाकताना किंवा एखादी जड वस्तू उचलताना काळजी घ्या. पावसाळ्यात पाठदुखी टाळण्यासाठी वरील टिप्स नक्की फाॅलाे करा.