नागपूरच्या वाढत्या विस्तारात सार्वजनिक वाहतुकीच्या सुलभ वाहतूक व्यवस्थेसह सर्व भागांना जाेडणाऱ्या उत्तम वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सध्या नागपूरमध्ये रस्त्यांच्या सुविधा चांगल्या असल्या, तरी त्या कमी पडत आहेत. वाहनांची संख्या वाढली आहे. पादचाऱ्यांसाठी सुरक्षित पदपथांसह सर्व भागांना जाेडणाऱ्या नवीन रस्त्यांची निर्मिती, चाैकांचे विस्तारीकरण, महानगरांतील बसथांबे, सार्वजनिक वाहतूक करणारे बसमार्ग, मेट्राे स्थानकापासून त्याला बसची कनेक्टिव्हिटी आदी मूलभूत विकासासाठी सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करण्यात आला आहे.सुमारे 25567 काेटींच्या प्रारूप आराखड्याला अधिक लाेकाभिमुख करण्यासाठी नागरिकांचीही मते याबाबत जाणून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
नागपूरच्या सर्वसमावेशक गतिशीलता आराखड्याबाबत मेट्राे भवनात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियाेजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार सर्वश्री कृष्णा खाेपडे, प्रवीण दटके, समीर मेघे, चरणसिंग ठाकूर, संजय मेश्राम, विभागीय आयु्नत विजयलक्ष्मी बिदरी, शहर पाेलीस आयु्नत डाॅ. रवींद्रकुमार सिंघल,महामेट्राेचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महामेट्राेचे संचालक अनिलकुमार काेकाटे, राजीव त्यागी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील; तसेच महामेट्राेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.
नागपूरचा विस्तार गतीने हाेत आहे. वाहनांची संख्या वाढते आहे. रस्ते अपुरे व वाहनांची संख्या अधिक अशी स्थिती आहे. मिहानमध्ये माेठ्या प्रमाणावर कामगार येत आहेत. स्वाभाविकच याचा ताण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर पडत असल्याने नवीन आराखड्यानुसार कामे लवकर व्हावीत, असे गडकरी यांनी सांगितले. सक्षम वाहतूक सुविधांचा नवीन आराखड्यात समावेश करण्याच्या सूचना चंद्रशखेर बावनकुळे यांनी केल्या.