वर्साेवा-भाईंदर प्रकल्पासाठी भूसंपादन करा

    29-Jul-2025
Total Views |
 

bhainadar 
मुंबईतील वाहतूक काेंडी दूर करण्यासाठी महापालिकेने वर्साेवा-भाईंदर प्रकल्प हाती घेतला आहे. ऑगस्टमध्ये या प्रकल्पाचे काम सुरू हाेणार आहे. प्रकल्पामुळे बाधित हाेणाऱ्या आवश्यक त्या जमिनीचे संपादन वेगाने करावे; तसेच शासकीय जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया जलद गतीने करावी, असे निर्देश महापालिकेचे अतिर्नित आयु्नत अभिजित बांगर यांनी दिले.या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या, ना-हरकत प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पाच्या मार्गरेषेने सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्राबाहेरील (नाॅन सीआरझेड) भागात प्रत्यक्षात कामे सुरू करण्याचे नियाेजन यावेळी करण्यात आले.वर्साेवा-दहिसर हा सागरी किनारा मार्ग पुढे दहिसर-भाईंदर उन्नत मार्गालाही जाेडला जाईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर
 
 
नरिमन पाॅइंटहून थेट दहिसर, भाईंदरपर्यंत जाता येणार आहे. या प्रकल्पांतर्गत कांदळवन प्रस्तावास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालयाकडून नुकतीच तत्त्वतः मान्यता प्राप्त झाली आहे. बांगर यांनी नुकतीच प्रकल्प स्थळास प्रत्यक्ष भेट देऊन कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. सुटे भाग निर्मितीसाठी जमिनीची उपलब्धता, बांधकाम, कार्यस्थळाकडे जाणारे रस्ते आदींची त्यांनी पाहणी केली.पूल विभागाचे अधिकारी व प्रकल्प सल्लागार यावेळी उपस्थित हाेते.सध्या प्रकल्पाच्या पूर्वतयारीची कामे सुरू आहेत. त्यात भूगर्भ मातीचे सर्वेक्षण, प्रकल्प प्रगतिपथावर असताना पर्यावरण, कामाच्या गुणवत्तेबाबतची आखणी, वाहतूक व्यवस्थापन, प्रकल्पात वापरण्यात येणारे साहित्य व विविध यंत्रसामग्रीची जमवाजमव, प्रकल्पाची संकल्पचित्रे व आराखडे तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या सर्व कार्यवाहीचा आढावाही बांगर यांनी घेतला.