ऐसेया मनें हाेआवें। तरी दाेषु न घडे स्वभावें। म्हणाेनि आतां झुंजावें। निभ्रांत तुवा।। (2.229)

28 Jul 2025 22:32:11
 
 

saint 
 
जेणे करून अर्जुन युद्धास प्रवृत्त हाेईल अशा बुद्धीने भगवंत त्याला स्वधर्म आचरण्याचा उपदेश करीत आहेत.अर्जुनाने युद्ध केले आणि जर ताे रणावर मरण पावला तर त्याला अनायासेच स्वर्ग-सुखाची प्राप्ती हाेईल ‘म्हणाेनि इथे गाेठी। विचार न करीं किरीटी। आता धनुष्य घेऊनि उठीं। झुंझ वेगीं।। (221) अर्जुना, यशाची अथवा अपयशाची चिंता न करता तू युद्धाला तत्पर हाे.युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे. याचे आचरण केल्यावर पाप नाहीसे हाेईल.स्वधर्माचे आचरण केल्यावर पाप कधी उरते का? पाण्यावर तरणारी नाव आपणांस कधी बुडविते का? सरळ चालणारा मनुष्य कधी वाटेत अडखळून पडताे का? अर्जुना, क्षत्रियाचा धर्म समजून तू युद्ध कर.
 
म्हणजे तुला पाप लागणार नाही. आपल्या मनाप्रमाणे झाले म्हणजे नेहमीच सुख हाेते, पण याचा संताेष आपण मानू नये.मनाविरुद्ध झाले तरी त्याचे दु:ख धरून बसू नये.‘लाभालाभ न धरावे। मनामाजीं। (226) हा लाभ आहे की हानी आहे याचाही विचार कधी मनात करू नये. युद्ध करीत असताना आपलाच जय हाेईल की पराजय हाेईल याची चिंता मनात कधीच करू नये.आपल्या स्वभावास अनुसरून असलेल्या उचित धर्माचे पालन केल्यावर जे सुख वा दु:ख हाेईल ते निवांत मनाने सहन करावे. काेणत्याही प्रकरचा लाेभ मनात न ठेवता उचित असे कर्तव्य करावे, म्हणजे सुखदु:खांची भावना हाेणार नाही. आपल्या धर्मावर लक्ष देऊन आचरण केले असता काेणताच दाेष लागत नाही. ‘म्हणाेनि आतां जुंझावें। निभ्रांत तुवां।’ अर्जुना, यासाठी काेणतीही शंका मनात धारण न करता तू युद्धासाठी सिद्ध हाे. (क्रमशः)
Powered By Sangraha 9.0