कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्म्यांना लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे आदरांजली

    28-Jul-2025
Total Views |
 
 
 
 
Kargil
 
कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली. भारताने 1999 मध्ये झालेल्या युद्धात पाकिस्तानला पराभूत केले हाेते. 26 जुलैस भारताने विजय मिळवला. त्यामुळे दरवर्षी हा दिवस ‘विजय दिन’ म्हणून साजरा केला जाताे.कारगिलमधील युद्धस्मारकात संरक्षण मंत्र्यांसह विविध मान्यवरांनी हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातही विजय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी येथील राष्ट्रीय युद्धस्मारकात पुष्पचक्र अर्पण करत हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमास लष्कराचे आजी-माजी अधिकारी, जवान व त्यांचे कुटुंबीय उपस्थित हाेते.मुख्य कार्यक्रमानंतर ले. ज. सेठ यांनी या सर्वांशी संवाद साधला; तसेच या युद्धात भारतीय जवानांनी गाजवलेल्या शाैर्याचे स्मरणही करण्यात आले. विजय दिनानिमित्त शिवनेरी ब्रिगेडतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात शस्त्रप्रदर्शन भरवण्यात आले हाेते.त्याला विद्यार्थी व नागरिकांचा माेठा प्रतिसाद मिळाला. लष्कराच्या सामर्थ्यांचे दर्शन घडवतानाच लष्कराबाबत यावेळी सविस्तर माहितीही देण्यात आली.