अनेक पिढ्यांपासून महिलांच्या हार्माेनल आराेग्याबाबत समाजात बाेलले जात आहे, परंतु, पुरुषांच्या हार्माेनल आराेग्याच्या समस्यांबद्दल फारशी चर्चा हाेत नाही. महिलांना त्यांची मासिक पाळी जाण्याच्या दरम्यान (प्रीमेनस्ट्रुअल सिंड्राेम, पीएमएस) हार्माेन्सच्या असंतुलनाचा त्रास हाेताे. गेल्या काही वर्षांत संशाेधनातून समजते की, महिलांप्रमाणेच पुरुषांनाही हार्माेनल असंतुलनाच्या त्रासाला (इरिटेबल मेल सिंड्राेम, आयएमएस) वयाच्या चाळिशीनंतर सामाेरे जावे लागते. थकवा, चिडचिड, लैंगिक दुर्बलता, झाेपेचे विकार, वजनात अचानक वाढ किंवा घट, नैराश्य किंवा उत्साहाचा अभाव, हे सगळे हार्माेनल असंतुलनाचे परिणाम असू शकतात.डाॅ. प्रदीप चाैधरी (फाेर्टिस हाॅस्पिटल, एंडाेक्रायनाॅलाॅजिस्ट) सांगतात, ‘अनेक पुरुषांमध्ये ही लक्षणे असली तरी समाजात ‘पुरुष अशक्त हाेत नाहीत, चाळिशीत असे हाेते, अतिताणामुळे हाेत असेल’, अशा चुकीच्या समजुती असल्याने हे दुर्लक्षित राहतात.
वैद्यकीय मदत व चाचण्या करून घेण्याऐवजी अनेक पुरुष ‘हे मानसिक आहे’ असे मानतात आणि याेग्य उपचारांपासून वंचित राहतात.’ डाॅ. चाैधरी सांगतात, ‘अनेक पुरुष रुग्ण चिडचिड, नैराश्य, लैंगिक दुर्बलता किंवा थकवा यासारख्या तक्रारी घेऊन येतात. पण त्यांच्यामध्ये टेस्टाेस्टेराॅन किंवा थायराॅईड हार्माेन कमी असण्याची शक्यता असते. यामध्ये मानसिक विकार समजून अँटी-डिप्रेशंट्स दिलजातात, जे परिणामकारक ठरत नाहीत. पारंपरिक उपचारांनी फरक न पडल्यास हार्माेन्सची चाचणी डाॅक्टरांनीही रुग्णाला करायला सांगावी,’ असे ते म्हणतात.चाळिशीतील 30 ते 50 टक्के पुरुषांमध्ये हार्माेनल असंतुलन असू शकते, विशेषतः जास्त तणाव, झाेप लागण्यात अडचणी किंवा वजनात अचानक बदल असेल, तर हे संकेत गंभीर असतात. मात्र, याकडे वेळेत लक्ष दिले जात नाही आणि त्यामुळे याेग्य उपचारही हाेत नाहीत.
‘पुरुषांतील पीएमएस’ संकल्पना : पश्चिमेतील देशांमध्ये आता ‘मेल पीएमएस’ किंवा पुरुषांच्या मासिक हार्माेन चक्राची संकल्पना स्पषट हाेत आहे. महिलांना त्यांची मासिक पाळी जाण्याच्या दरम्यान पीएमएसमध्ये हार्माे न्सच्या असंतुलनाचा त्रास हाेताे. संशाेधनानुसार, तसाच त्रास पुरुषांमध्येही, चाळिशीनंतर हार्माेनल चढ-उतार झाल्यामुळे दिसताे. हार्माेन्सच्या अडचणीमुळे त्यांच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक प्रकृतीवर परिणाम हाेताे. यामध्ये लैंगिक इच्छा कमी हाेणे, थकवा जाणवणे, चिडचिड हाेणे, झाेप लागण्याची अडचण, वजन कमी-जास्त हाेणे, यांसारखी लक्षणे दिसू शकतात. महिलांना हाेणाऱ्या त्रासाची जशी समाजात आणि वैद्यकीय क्षेत्राला माहिती आहे, तेवढी जागरूकता पुरुषांना मध्यम वयात हाेणाऱ्या त्रासाबद्दल नाही.
‘एका रिपाेर्टनुसार, 50 ते 70 वर्षे वयाेगटातील 45 ते 60% पुरुषांमध्ये टेस्टाेटेराेनची पातळी कमी-जास्त असते. काॅर्टिसाॅलची खाली-वर हाेणारी पातळी पुरुषांच्या आराेग्यावर प्रभाव टाकत असते.’ डाॅ. प्रवीण गुप्ता (फाेर्टिस हाॅस्पिटल), ‘मानसाेपचार तज्ज्ञांनी थायराॅईड व टेस्टाेटेराेनच्या चाचण्या रुग्णांना करायला सांगून, त्यानुसार डाॅक्टर व उपचार सुचवावेत. विशेषतः जर मानसाेपचार औषध पद्धती रुग्णाला लागू पडत नसेल, तर हे निर्णय घेणे रुग्णाच्या हिताचे आहे.’ ‘रुग्णाचा आजार मानसिक आहे किंवा शारीरिक आहे किंवा हार्माेन्सच्या प्रमाणांचा ताे परिणाम आहे, याचे निदान डाॅक्टरांना याेग्य वेळी हाेणे गरजेचे आहे. तसे झाल्यास, याेग्य चाचण्या- निदान-उपचार मिळून रुग्ण बरा हाेऊ शकताे. त्यात जर चूक झाली तर रुग्णाला दीर्घ काळासाठी गंभीर आजारांना सामाेरे जावे लागते,’ डाॅ. गुप्तता सांगतात.
डाॅ. संदीप खर्रब, ‘अनेक पुरुषांच्या आयएमएसकडे काेणाचेच लक्ष जात नाही. प्रामुख्याने, समाजाला घाबरत हे रुग्ण वैद्यकीय मदतीचा विचारही करत नाहीत. या विषयातील जागरूकता व्यक्ती आणि समाजात निर्माण हाेणे, यामुळे अनेक पुरुषांना वेळीच मदत मिळून ते सुदृढ आयुष्य जगू शकतील. चाळिशी झाल्यावर पुरुषांनी दर वर्षी आराेग्य तपासणीत, हार्माेन्सच्या तपासणीचाही समावेश करावा. पुरुषांना थकवा येणे, हे अत्यंत स्वाभाविक आहे आणि समाजानेही ते स्वीकारले पाहिजे. ‘जीवशास्त्र’ आराेग्याच्या विषयात स्त्री व पुरुष यांच्यात भेद मानत नाहीत.