आगामी काळात हाेणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका मु्नत आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी सर्व अनुषंगिक बाबी, साेयीसुविधांसंदर्भात अचूक नियाेजन करून करावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयाेगाचे आयु्नत दिनेश वाघमारे यांनी येथे दिले.आगामी काळात हाेणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा वाघमारे यांनी येथील विभागीय कार्यालयात आयाेजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बाेलत हाेते. राज्य निवडणूक आयाेगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागीय आयु्नत डाॅ. श्वेता सिंघल, राज्य निवडणूक आयाेगाचे विशेष कार्य अधिकारी अ. गाे. जाधव, जिल्हाधिकारी आशिष येरेकर (अमरावती), अजित कुंभार (अकाेला), डाॅ. किरण पाटील (बुलडाणा), भुवनेश्वरी एस.वाशिम), यवतमाळचे प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपायु्नत संताेष कवडे यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे जिल्हा परिषद व नगरपालिका प्रशासनाचे वरिष्ठअधिकारी यावेळी उपस्थित हाेते.
आगामी काळात हाेणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती विभागाचा निवडणूक पूर्वतयारीचा सविस्तर आढावा वाघमारे यांनी घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वाढलेल्या मतदारांची संख्या, मतदान केंद्रांची संख्या लक्षात घेऊन मनुष्यबळाचे नियाेजन करावे.मतदान केंद्रांवर महिला निवडणूक अधिकारीकर्मचारी व मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची सुविधा करावी. दिव्यांगमतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी प्रशासनाने सुविधा न दिल्याने मतदानाचा ट्नका कमी झाला, अशी तक्रार येता कामा नये. संवेदनशील मतदान केंद्रांवर कडक बंदाेबस्त व सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.