प्रश्न 1 : माझा मुलगा 13 वर्षांचा आहे. हल्ली ताे खूप डिमांडिंग झाला आहे. हट्ट करू लागला आहे. काही समजवायला गेले, तर उलट उत्तर देताे.काय करावे?
उत्तर : मूल आज जे वागत आहे, त्याची मुळे काही वर्षांपूर्वी दाखवलेल्या त्या छाेट्या छाेट्या व्यवहारांमध्ये आहे, जेव्हा आपण त्याची प्रत्येक मागणी पूर्ण केली.आई-वडिलांच्या रूपात आपण कळत नकळत मुलांचे अनुचित वर्तन बळकट करताे व याचा परिणाम हा आहे. जेव्हा मुलांनी दुवर्तन करण्यास सुरुवात केली असेल, तेव्हा आपण त्याच्याशी आरामात बाेलावे व समजवावे की, त्याच्या अवास्तव मागण्या का पूर्ण करता येणार नाहीत.त्याला सांगावे की, पालकांकडे काही मागण्याची याेग्य पद्धत कशी असते. त्याला ऑर्डर न लादता आपण का नकार देत आहाेत, हे त्याला सांगावे. मुलासाेबत ‘घरातील याेग्य वर्तन’ चार्ट सेट करा. ज्यामध्ये घरातील सर्वांसाठी नियम असावेत. एकदा जेव्हा त्याला हे समजेल की, मी असे का करू नये, तेव्हा ताे याेग्य पद्धत अनुसरेल. जेव्हा मूल तडजाेडीचे पालन करील तेव्हा त्याला शाबासकी द्यायला विसरू नका.
प्रश्न 2 : माझा मुलगा 7 वर्षांचा आहे.दिवसभर आळस करताे. अभ्यासाची आवड नाही.काही बाेलले तर चिडताे. त्याच्याशी कसा संवाद साधावा.
उत्तर : मुलांमध्ये व किशाेरांमध्ये शारीरिक क्रियाच ताकद व सहनश्नती सुधारतात, बळकट हाडे व स्नायू निर्माण करीत असतात. अॅक्टिव्हिटीने आळस दूर हाेताे व मूल एनर्जेटिक राहते. त्यांना दिवसभरातील कामात सामील करा. सात वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांना आठवड्यातील बहुतेक दिवसांमध्ये 60 मिनिटांचा माॅडरेट टू हाय इंटेसिटीची शारीरिक क्रिया मिळायला हवी. आठवड्यात काही क्रिया अशा असाव्यात जेणेकरून स्नायूंची निर्मिती करतील. उदा.चढणे-उड्या मारणे. 60 मिनिटांच्या क्रिया एकाचवेळी न करता वेळेचे छाेटे ब्लाॅक करा. उदाहरणार्थ 20 मिनिटे चालणे, 10 मिनिटे दाेरीवरील उड्या, 30 मिनिटे पालकांसाेबत खेळणे. घरातच लपाछपीसारखे हलकेफ ुलके खेळ, बाॅलगेम्स खेळणे. यासाेबतच डाेळ्यांचे व्यायामही करून घ्या.