देशातील ई-स्पाेर्ट्सचे मार्केट दीड हजार काेटींवर गेले आहे

    25-Jul-2025
Total Views |
 
 

Market 
 
देशात टे्ननाॅलाॅजीचा विस्तार माेठ्या प्रमाणात झाला आहे. देशात 90 काेटी लाेक इंटरनेट वापरतात, असे सांगितले जाते. अशा परिस्थितीत खेळ क्षेत्रही मागे राहिले नाही.मैदानी खेळाबराेबरच आता ई-स्पाेर्ट्सची क्रेझही देशात वेगाने वाढत आहे.युवा खेळाडू संगणकावरच फिफा, चेस, क्रिकेट खेळाचे महारथी बनत आहेत.मार्केट रिसर्च कंपनी आयएमएआरसीच्या रिपाेर्टनुसार ई- स्पाेर्ट्सचे मार्केट गेल्या दाेन वर्षंर्त सुमारे 1000-1700 काेटी रुपयांपर्यंत पाेहाेचले आहे.आगामी सात वर्षांत ते आठ हजार काेटी रुपयांचे हाेईल, असा अंदाज व्यक्त केला जाताे. हे जगातील ई-स्पाेर्ट्स मार्केटच्या सुमारेपाच टक्के आहे.भारतात गेल्या तीन वर्षांत ई-स्पाेर्ट्सचा ट्रेंड वाढलेला दिसताे.
 
इंडियन गेमिंग रिपाेर्टनुसार देशात 2022पर्यंत ई-स्पाेर्ट्स मार्केट केवळ 342 काेटी रुपयांचे हाेते.पण, जाहिराती, प्लॅटफाॅर्म यामुळे इंडस्ट्रीत वेगाने वाढ झाल्याचे दिसते. ही वाढ पाहून 2026मध्ये हाेणाऱ्या एशियाडमध्ये आता सातऐवजी 11 ई-स्पाेर्ट्स इव्हेंट हाेणार आहेत.चेन्नई ग्लाेबल चॅम्पियनशिप ई-स्पाेर्ट्सला प्राेत्साहन देण्यासाठी तमिळनाडू सरकारने चेन्नई ग्लाेबल चॅम्पियनशिप आयाेजित केली.तर मुंबईत भारतातील पहिले फिफा ई-स्पाेर्ट्स प्राे प्लेअर शांतनु बासू यांनी इंडियन सुपर गेमिंग लीग (आईएसजीएल) नावाची एक लीग केली. ज्यामध्ये तीन दिवसांची फायनल आयाेजिली हाेती.शांतनु यांनी सांगितले की, आयएसजीएल एक मल्टी स्पाेर्ट्स लीग आहे. यामध्ये शूटर व्हिडियाे गेम, वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप आयाेजिली आहे. यामध्ये खेळाडू व्हर्च्युअल पद्धतीने क्रिकेट खेळतात.