
1947 साली भारताची फाळणी झाली तेव्हा ब्रिटिशांनी त्यांच्या सैनिकांना भारतात जायचं की पाकिस्तानात जायचं, असे पर्याय दिले. साहिबजादा याकूब खान हा रामपूरच्या नवाबांच्या घराण्यातला मुलगा. ताे रामपूरला आला आणि आईला म्हणाला, तू सगळं आवर. मी पाकिस्तानाचा पर्याय निवडला आहे. मी कराचीमध्ये स्थिरस्थावर झालाे की येऊन तुला घेऊन जाईन. आईने सांगितलं, तुझ्या वाडवडिलांनी हा देश ब्रिटिशांपासून स्वतंत्र व्हावा यासाठी लढा दिलेला आहे. ही आपली मातृभूमी आहे, हा माझा देश आहे, मी मरेपर्यंत याच देशात राहणार. याकूब म्हणाला, ठीक आहे. मी माझ्या आवडत्या वस्तू नेण्यासाठी येईन, ताेवर तू विचार करून ठेव. याकूबला पुन्हा रामपूरला येण्याची संधीच मिळाली नाही. फाळणीनंतर लगेचच सीमेवर काही भागांमध्ये दाेन्ही देशांमध्ये लढाई सुरू झाली. मेजर याकूबला तिकडे धाव घ्यावी लागली. तिथे ज्या भारतीय तुकडीचा त्याला सामना करावा लागला, तिचं नेतृत्व करत हाेता मेजर युनूस खान, ताेही रामपूरचाच हाेता आणि याकूबचा सख्खा माेठा भाऊ हाेता. या लढाईत युनूसने याकूबचा एक हातही जायबंदी केला हाेता. खूप वर्षांनी 1982 साली दाेघे भारतात पुन्हा भेटले तेव्हा याकूब पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री बनला हाेता. युनूस सन्मानाने निवृत्त झाला हाेता