आजारी पडण्यापूर्वीच व्यायाम सुरू करा

    25-Jul-2025
Total Views |
 
 

disease 
 
केव्हा करावी सुरुवात शरीर फिट ठेवण्यासाठी नियमितपणे सकाळी व संध्याकाळी वा किमान एका वेळी ए्नसरसाइज करणे आवश्यक असते. यासाठी आपल्याला एखादा शारीरिक त्रास हाेण्याची वाट पाहण्याची गरज नाही. ए्नसरसाइजने शरीराला फायदाच हाेताे. आजच्या व्यस्त जीवनात अनेकजण यासाठी वेळ काढू शकत नाही. असे लाेक आठवड्यातून किमान 3 दिवस जिममध्ये जाऊ शकतात. असे एक फिटनेस ट्रेनर सांगतात.ते पुढे म्हणतात की, ‘ सकाळी फक्त 15 मिनिटांचा व्यायामच सुरुवातीला पुरेसा असताे. जेव्हा आपल्याला सवय हाेईल तेव्हा हळू हळू वेळ वाढवून अर्धा तास करू शकता. आपल्या व्यस्त जीवातील अर्धा तास काढूनही जर एखादा व्यायाम केला तर असे करणे व्यायाम अजिबात न करण्यापेक्षा उत्तम असते.
 
’ अनेकजण आपल्या जीवनात हाेणाऱ्या धावपळीलाच ए्नसरसाइजचा पर्याय मानतात. अर्थात गृहिणी घरातील दिवसभराचे काम वा कर्मचारी ऑफिसातील कामासाठी हाेणाऱ्या धावपळीला पुरेसा व्यायाम मानून घेतात.डाॅ्नटरांच्या मते दिनचर्येला ए्नसरसाइजचा पर्याय मानणे चूक आहे. सकाळी व्यायाम करणे सर्वाेत्तम असते. काहीजण असेही असतात जे उतारवय वा एखाद्या शारीरिक त्रासामुळे इच्छा असूनही ए्नसरसाइज करू इच्छित नाही पण लठ्ठपणापासून सुटका मिळवू इच्छित असतात. अशा सर्व लाेकांसाठी याेग्य उत्तर आहे बीएलसीसी, पसर्नल पाॅइंट अशी फिटनेस केंद्र आपल्या शरीरानुसार फिटनेस प्राेग्राम बनवतात. व निरनिराळ्या मशिन्सच्या साह्याने शरीराचे फॅट कमी करून शरीराला याेग्य आकार देण्यास मदत करतात.
 
खाण्या-पिण्यावर नियंत्रण हवे : फिटनेस प्राेग्राम तर आपण सुरू केला पण यासाेबत आपण आपल्या खाण्याच्या सवयीही नियंत्रित करण्याची गरज असते.विशेषत: गृहिणींनी. आपण आपल्या पती व मुलांच्या ताटात उरलेले खाणे तसेच सर्व केलेला स्वयंपाक संपवण्याची सवय साेडावी. तसेच कर्मचारी लाेकांनीही आपले जेवण ठराविक वेळी घेण्याची सवय लावून घ्यावी. जेवण टाळू नये.
जंकफूड कमी खावे.