चार वर्षांपूर्वी बंगळुरूच्या फूड टेक स्टार्टअपने दाेन कार्यालये बंद करून एक माेठे ऑफिस घेतले आणि माेठे कॅन्टीन सुरू केले. कर्मचारी पुन्हा ऑफिसला येऊ लागले.सुरुवातीला सर्वांना कॅन्टीनला जेवायला खूप आनंद वाटला.पण काही दिवसांत जेवणात ताेच ताेचपणा, चव नसलेला भात, पातळ सांबर, गरम नसलेली भाजी व एकूणच त्यांना कंटाळवाणा अनुभव येऊ लागला. नंतर काहींनी बाहेरून डबा आणण्यास सुरुवात केली. परंतु, मेसच्या जेवणावरही संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. याच उदाहरणाला धरून, काेविड महामारीच्या नंतर काही काळ लाेकांनी घरपाेच येणारी भाजी, फळे आणि इतर वस्तू ऑनलाइन अॅपवरून मागवल्या परंतु त्यांचे ते आकार्षण कमी झाले व पुन्हा लाेकांची गर्दी वाढू लागली ती जुन्या व जवळच्या मार्केट, बाजार व मंडईत.
बदल असा झाला : ई-काॅमर्सच्या अॅप्सनी सुरुवातीला अतिशय साेयीस्कर वाटणाऱ्या सेवा लाेकांना दिल्या. पण हळूहळू लाेक, ठराविक वस्तूंसाठी ती अॅप वापरू लागले. अंडी, ब्रेड, बटर, टूथपेस्ट सारख्या वस्तू अॅपवरून तर मटारच्या शेंगा, पालेभाज्या, ताजी फळे, मासे व मांस या गाेष्टींसाठी लाेकांनी परत जवळच्या भाजीवाल्याकडे वा मार्केटमध्ये जायचे ठरवले.अॅपवरील पदार्थांचा दर्जा : ई-काॅमर्स अॅपमधून मिळणाऱ्या फळभाज्या व ताज्या वस्तू दर्जेदार असतात, परंतु, प्रत्यक्षात त्या फारशा चांगल्या निघत नाहीत. बहुतेक लाेक हे मान्य करतील की जास्त किंमत अधिक, कमी वजन व साठवलेली, जुनाट वाटणारी उत्पादने हे अनुभव नेहमीचेच झाले आहेत. या दर्जाला व एका प्रकारच्या फसवणुकीला लाेक त्रासले आहेत.
परदेशातील अॅपचे अनुभव : परदेशातही असेच अनुभव येतात. सिंगापूरमध्ये राहणारी अंजली दुरांदाे सांगते, ‘गेल्या काही महिन्यांत मी क्विक अॅपवर खरेदीचा प्रकार थांबवला. अनेक वेळा, मी मागवलेल्या पदार्थांमध्ये डिलिव्हरीच्या दरम्यान काहीतरी चुकीच्या गाेष्टी यायच्या. एकदा मी आइसक्रीम मागवले हाेते, पण ती मला मिळेपर्यंत वितळलेली हाेती. दुसऱ्या वेळी त्या प्लॅटफाॅर्मने सांगितले की, फाेटाे त्यांच्याकडे वेगळा आहे, म्हणून त्यांनी मला डिलिव्हरी नाकारली.एकदा आंबे मागवले हाेते, पण ते अॅपवर फाेटाेत दिसणाऱ्या आंब्यासारखे नव्हते, कमी प्रतीचे हाेते. मी पुन्हा जवळच्या बाजारात जाते. ताजे सामान घेतले की खरेदीचेही समाधान मिळते.’ ग्राहकांच्या ‘डाटा’चा गैरवापर : बिनी व्हर्गिस, यांच्या मतानुसार, ‘असे अॅप वापरताना आपण स्वतःची तपशीलात माहिती भरताे. या ऑनलाइन कंपन्यांकडे तुमचे नाव, फाेन नंबर, पत्ता, तुमच्या खरेदीची ‘हिस्ट्री’ व खरेदीचा पॅटर्न सहजच जमा हाेताे.
ही माहिती विकली जाऊ शकते, जाहिरातबाजीसाठी वापरली जाऊ शकते, असुरक्षित असू शकते वा खरेदीसाठी ‘सजेस्ट’ केले जाऊ शकते. अनेक ग्राहकांच्या लक्षातही येत नाही, की एक वस्तू खरेदी करण्यामागे त्यांनी त्यांची किती माहिती बाहेर पुरवली.एक ग्राहक अनेकदा स्वयंपाकाच्या अगदी थाेडा वेळ आधी खरेदी करत असे. तेव्हाच नेमके किमान दाेन तास तरी डिलिव्हरीसाठी लागायचे व सगळा कार्यक्रम बदलावा लागायचा.रुचिका आहुजा सांगते, ‘तुम्ही जर 30 ते 50 रुपयांच्या वस्तू मागवत असाल आणि एकही वस्तू वापरण्यायाेग्य निघाली नाही, तर त्या वस्तू निरुपयाेगी ठरतात. आणखी एक समस्या म्हणजे अति प्रमाणात केलेले पॅकेजिंग - प्लॅस्टिक बबल रॅप्स आणि स्टिकर्स, हे सर्व उघडून मग ती वास्तू वापरणे म्हणजे एक तापच असताे.
स्वयंपाकाची संस्कृती बदलली : फूड एजंट रुचिका आहुजा सांगतात, ‘सामान्य ग्राहक आतई-काॅमर्स प्लॅटफाॅर्मवर छाेट्या-माेठ्या खरेदीसाठी जास्तच अवलंबून झालाय. पूर्वी आम्ही यादी करायचाे, बाजारात जायचाे आणि ठरलेल्या वस्तूंची एकदाच खरेदी करून यायचाे. आता मागणीनुसार आपण एका वस्तूपासून माेठ्या यादीपर्यंत मागवताे आणि मागवत राहताे.’त्या पुढे म्हणतात, ‘या अॅप्समुळे आपली जीवनशैलीच बदलली आहे. आपण खरेदी प्लॅन करायला विसरत चाललाे आहाेत. स्वयंपाकाच्या प्रक्रियेमध्ये काही गाेष्टी कमीजास्त लागतात. त्यातून मार्ग काढत आपल्याला अन्नाचा खरा अर्थ समजताे. पूर्वी अन्न शिजवणे म्हणजे नियाेजन, समज, साधने आणि कल्पनाशक्ती यांचा एकत्रित अनुभव असायचा. आता मात्र या प्रक्रियेला सरधाेपट, यांत्रिकपणा आला आहे. आपण अनेक गाेष्टी पुन्हा वापरून, वाचवून, वाढवून खाण्याची सवय हरवत चाललाेय. वास्तविक, आपण फक्त स्वयंपाक करत नव्हताे तर आपण एक संस्कृती जगत हाेताे.’
स्थानिक विक्रेते समाजाचे घटक : ‘क्यू-काॅमस’ अधिक वेगवान असू शकते, पण त्याने आपल्या बाजार-मंडईच्या संस्कृतीचे नुकसान केले आहे, असे केतन भानुशाली म्हणतात. ते अंधेरी मार्केटमध्ये गेल्या सहा वर्षांपासून विक्रेते आणि ग्राहक यांच्या विषयात काम करत आहेत. या अॅपमुळे लाेकांनी पारंपरिक दुकानांमध्ये खरेदी साेडून दिली आहे. माेठमाेठ्या ऑनलाइन कंपन्या आकर्षक सवलती देतात, ग्राहकांना आकर्षित करतात आणि त्यांचीच उत्पादने विकण्यासाठी अॅप चालवतात. त्यामुळे किरकाेळ विक्री करणाऱ्या दुकानदारांवर दबाव वाढताे.’