लडाखमधील लेह येथील जगप्रसिद्ध पँगाेंग तलाव आणि नुब्रा व्हॅलीच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील आणि प्रतिबंधित भागात सुपरबाईक चालवणे आणि स्टंट करणे या आराेपाखाली अली अलियान इक्बाल या युट्यूबरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवर सुमारे 5,00,000 फाॅलाेअर्स असलेल्या युट्यूबरने लेहमध्ये बाईक स्टंटचे व्हिडिओ पाेस्ट केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. लेह पाेलिसांनी सुपरबाईक बेपर्वापणे चालवल्याबद्दल गुन्हा दाखल केला. भारतीय दंड संहिता (खझउ) 2023 च्या कलम 125 आणि 292 अंतर्गत आराेप दाखल करण्यात आले.इक्बालने स्वतः पाेस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ताे त्याचा शर्ट काढताना आणि त्याच्या सुपरबाईकवर डाेके ठेवून उभे राहून दरीतून फिरताना आणि वाळूमध्ये बाईक अडकवून धुळीचे ढीग साफ करताना दिसत आहे. हे सर्व व्हिडिओ खूप व्हायरल झाले आहेत.