हळूहळू व्य्नतीच्या जीवनात फ्नत शुभकर्मे राहतील आणि अशुभ कर्मे नाहीशी हाेतील.आज इतकंच. परंतु, पाच मिनिटे थांबा. माझे संन्यासी पाच मिनिटे, येथे गातील, नाचतील.आपणापैकी ज्यांना यात सहभागी व्हायचं आहे, त्यांनी सहभागी व्हावे. पण, जे नुसतेच बसून आहेत, त्यांनी निदान टाळ्या वाजवाव्या आणि गाण्यात साथ द्यावी. या संकीर्तनाचा अपूर्व प्रसाद घ्यावा व मग आपण निराेप घेऊया.याेग परममंगल आहे. परम-मंगल या अर्थाने की फ्नत याेगाच्या मार्गानेच आपणाला जीवनसत्याची, जीवनानंदाची प्राप्ती हाेऊ शकते. परममंगल याही अर्थाने की, याेगाच्या दिशेने गती करणारी व्य्नती आपली स्वत:ची सन्मित्र हाेऊन जाते आणि याेगाच्या विपरित दिशेने जाणारी व्य्नती आपली स्वत:चीच शत्रू सिद्ध हाेते.
कृष्ण अर्जुनाला सांगत आहे की व्य्नतीने आपल्या आत्म्याचे अधाेगमन हाेऊ न द्यावे, तर ऊर्ध्वगमन करावे हे उचित आहे. हा समजूतदारपणा आहे. त्यातच बुद्धिमत्ता आहे आणि ऊर्ध्वगमन आणि अधाेगती या दाेन्ही गाेष्टी श्नय आहेत. ही गाेष्ट नीट समजून घेतली पाहिजे.खालची यात्रा करायला किंवा वरची यात्रा करायला व्य्नतीचा आत्मा स्वतंत्र आहे. जेथे स्वातंत्र्य तेथे धाेका ठेवलेलाच. स्वातंत्र्याचा अर्थच आपल्या अहिताची माेकळीक, स्वातंत्र्य हा आहे. एखाद्याने आपल्याला म्हटले की आपले जेवढे हित आहे तेवढेच करायला आपण स्वतंत्र आहात, जे आपल्या हिताचे नाहीये ते करायला आपण स्वतंत्र नाही, तर अशा स्वातंत्र्याला काही अर्थ उरत नाही. मला काेणी सांगितले की मी फ्नत धार्मिक व्हायला स्वतंत्र आहे, मी अधार्मिक व्हायला बिलकूल स्वतंत्र नाही, तर हे स्वातंत्र्य निरर्थक आहे, ते पारतंत्र्याचेच एक रूप आहे.मनुष्याचा आत्मा स्वतंत्र आहे आणि जेव्हा काेणी स्वतंत्र आहे असे आपण म्ह