सुरुवातीला हवाहवासा वाटणारा पाऊस मात्र काही दिवसांनी नकाेसा वाटू लागताे. कारण साथीच्या आजारांमुळे सर्वसामान्य जेरीस येतात.पावसाळ्यातील आजारांचे मूळ कारण म्हणजे दूषित पाणी, खराब अन्न व आजूबाजूला असणारी अस्वच्छता.बरेचदा ताप, थंडी, खाेकला, कावीळ, उलटी, जुलाब या आजारांनी लहान मुले, वृद्धांना त्रास हाेताे. सुरुवातीला साधा वाटणाऱ्या सर्दी-खाेकला, तापाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर मलेरिया, डेंग्यूच्या तापाचेही निदान हाेऊ शकते. त्यामुळे याेग्य तपासणी करून आजाराबाबत वेळीच खातरजमा करावी अन्यथा सर्दी-पडसे समजून अंगावर काढणे महागात पडू शकते.
डेंग्यू : पावसाळ्यात सर्रास दिसून येणारा आजार. दरवर्षी येणाऱ्या रुग्णांपैकी 20-25 साथीच्या रुग्णांमध्ये या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांचे प्रमाण दिसून येते. डेंग्यूची लक्षणे सहज ओळखता येतात. अतिताप, रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी हाेणे, अंगावर चट्टे ही प्राथमिक लक्षणे दिसून आल्यास त्वरीत डाॅक्टरांना भेटणे आवश्यक आहे. घरात अथवा कार्यालयात डासांसाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक
.
चिकनगुनीया : साचलेलं पाणी, एसी, कुलरप्लाण्टमधून हाेणारा पाण्याचा निचरा, पाण्याची पाइपलाइन तसेच भांडी आदीवर घाेंगावणारे मच्छर यांमुळे चिकनगुनिया हाेऊ शकताे.