काेविडनंतर देशात वैय्नितक काॅम्प्युटरची संख्या 15% वाढली

    24-Jul-2025
Total Views |
 

covid 
 
देशातील घरांमध्ये, वैयक्तिक संगणक (पर्सनल काॅम्प्युटर/पीसी) वापरात काेविड-19च्या महामारीनंतर लक्षणीय वाढ झाली आहे. 2019मध्ये केवळ 6 ते 8% घरांमध्ये पीसी हाेता, 2024 मध्ये हे प्रमाण 13 ते 15% पर्यंत पाेहाेचले आहे.एका सरकारी संस्थेच्या आकडेवारीनुसार, ग्राहकांसाठीच्या घरगुती वापराच्या पीसींच्या वार्षिक विक्रीतही माेठी वाढ झाली असून, 2019 मधील 40 लाखांवरून 2024मध्ये ही संख्या 70 लाख युनिट्सवर पाेहाेचली आहे.सध्या महामारीनंतर बाजारपेठेत आलेली पीसींच्या विक्रीची वाढ तात्पुरती असली तरी दीर्घकालीन संधीकडे ही विक्री वळत आहे, वर्क फ्राॅम हाेम आणि शिक्षणासाठी पीसींची संख्या घराेघरी वाढत आहे. पीसी रिफ्रेश (अपडेट) सायकल्स, खरेदीसाठी आर्थिक सुलभता, तसेच मध्यम किमतीत मिळणाऱ्या एआय पीसी संदर्भातील उत्सुकता, या कारणांमुळे ही वाढ झाली आहे. तरीही, अद्याप पर्सनल पीसीमध्ये बरीच सुधारणा आवश्यक आहे, तर त्यांचा वापर अजूनही वाढेल.
 
‘भारतातील घरांमध्ये पीसी वापर अद्यापही चीन आणि इतर विकसनशील देशांच्या तुलनेत कमी आहे,’ असे आयडीसीचे मुख्य विश्लेषक भरत शेनाॅय यांनी सांगितले.छाेट्या शहरांमध्ये खरेदीच्या आर्थिक क्षमतेची मर्यादा, ही पीसीच्या खरेदीतील एक माेठी अडचण आहे. मात्र ब्रँड्सकडून मिळणाऱ्या ऑफर, कॅशबॅक याेजना आणि नाे-काॅस्ट ईएमआयच्या माध्यमातून ही तफावत भरून काढण्याचे प्रयत्न हाेत आहेत, असेही शेनाॅय म्हणाले. गावात व छाेट्या शहरांमध्ये पीसीचा वापर अद्यापही कमी प्रमाणात असल्याने, पहिल्यांदा खरेदी करणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी भरपूर वाव आहे आणि बाजारात वातावरणही सकारात्मक आहे.महामारीमुळे आलेल्या तात्पुरत्या उसळीनंतर पीसी विक्री काही काळासाठी थाेडी मंदावली हाेती, पण आता ती पुन्हा वाढत आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 2025च्या वर्षभरात पीसी विक्रीत 2.5% वाढ हाेईल, तर 2026 मध्ये ती 4.2% पर्यंत पाेहाेचेल, ज्यात प्रामुख्याने घरगुती वापरांसाठी डेस्कटाॅप पीसीही असतील.