क्रिएटर्स इकाॅनाॅमीचे महाराष्ट्र राज्य केंद्र बनेल

    24-Jul-2025
Total Views |
 

CM 
 
‘सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) यांच्यात सामंजस्य कराराच्या अनुषंगाने क्रिएटर्स इकाॅनाॅमीच्या विकासासाठी कुशल मनुष्यबळ विकासाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. ही केवळ सहकार्याची सुरुवात असून, येत्या काळात महाराष्ट्र हे देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकाॅनाॅमीचे केंद्र बनेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्य्नत केला.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एफटीआयआय आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (एमएफएससीडीसी) यांच्यात सामंजस्य करार झाला. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, एफटीआयआयचे अध्यक्ष आणि अभिनेते आर. माधवन, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, फिल्म सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसेपाटील, एफटीआयआयचे कुलगुरू धीरज सिंग, पीआयबीच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मकदूम, एफटीआयआयचे प्रा. संदीप शहारे; तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.
 
एफटीआयआयची प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय स्तरावरील आहे. या सामंजस्य करारामुळे आता राज्यातील गावखेड्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पातळीवरच प्रवेश घेता येईल. त्यामुळे राज्यातील गावखेड्यातील, तालुक्यातील मुलांनी आता चित्रनगरीकडे करिअर घडवण्याच्या उद्देशाने पाहावे. राज्यात गाेरेगाव, काेल्हापूर, प्रभादेवी आणि कर्जत या चार ठिकाणीही केंद्र आहे. या करारामुळे राज्यात राेजगाराच्या संधी मिळतील.चित्रपटांसाठी राज्यातील लाेकप्रिय लाेकेशन्सचा प्रचार हाेईल, असे शेलार यांनी सांगितललहान शहरांमधून माेठ्या प्रमाणावर प्रतिभावान व्य्नती पुढे येत आहेत. पश्चिमात्य चित्रपटांत नेहमीच सुपरमॅन, बॅटमॅन आणि स्पायडरमॅनच्या कथा असतात; पण आता आपण आपल्या गावाशहरांमधून आलेल्या या लाेकांकडील अद्वितीय कथा आणि त्यांच्या माध्यमातून सुपरपाॅवर आणि साॅफ्ट पाॅवर या दाेन्ही गाेष्टी साध्य करू शकणार असल्याचे माधवन यांनी सांगितले. यावेळी स्वाती म्हसे-पाटील व धीरज सिंग यांनी सामंजस्य कराराचे आदानप्रदान केले.