ब्रिटिश स्टार्टअप डीपची पाण्याखाली माणसांसाठी निवासस्थाने बनविण्याची तयारी
23-Jul-2025
Total Views |
हाॅलिवूड मूव्हीच्या सेट प्रमाणे दिसणारी ही प्रतिमा समुद्राच्या आत तयार करण्यात येणाऱ्या कायमस्वरूपी निवासी बिल्डिंगची आहे. ब्रिटिश स्टार्टअप डीपच्या या महत्त्वाकांक्षी प्राेजे्नटचा हेतू समुद्रात मानवी निवासस्थाने सुरू करणे हा आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सन 2027पर्यंत 200 मीटर खाेलवर असलेल्या या बिल्डिंगमध्ये रिसर्चर्सची टीम राहील. ते एका शिफ्टमध्ये 28 दिवसांपर्यंत राहू शकतील. हे त्यांना एपिपेलजिक म्हणजे ‘सूर्यप्रकाश’ क्षेत्राच्या संपूर्ण भागापर्यंत पाेहाेचवील. तिथे सूर्याचा प्रकाश पाेहाेचताे आणि 90% समुद्री जीवन तिथेच आढळून येते. तिथपर्यंत गेल्याने वैज्ञानिकांना समुद्रातील निरीक्षणामध्ये मदत मिळेल.