देशातील हाय नेटवर्थ आणि अल्ट्रा हाय नेटवर्थ असलेले म्हणजेच धनाढ्य आणि अतिधनाढ्य लाेक सहलींवर वारेमाप खर्च करण्यात मागेपुढे पाहत नाहीत, असे दिसून येते. श्रीमंत वर्ग अतिश्रीमंत हाेत चालला आहे. असा अतिश्रीमंत वर्ग आपली संपत्ती स्वतःच्या आनंदासाठी खर्च करत आहेत.त्यामध्येच ल्नझरी ट्रिपवर माेठ्या प्रमाणात पैसा खर्च हाेताना दिसत आहे.स्पेस ट्रॅव्हल, अंटा्निर्टकामध्ये क्रूज ट्रॅव्हल, ग्लेशियर्सच्यावर हेलिकाॅप्टरमधून भ्रमण, पाणबुडीमध्ये समुद्राच्या खाेलवर डुबकी मारणे, गरम हवा भरलेल्या फुग्यातून हवेत प्रवास यांना खूप मागणी आहे. त्याचबराेबर अल्ट्रा ल्नझरी आफ्रिकन प्रवासालाही खूप मागणी वाढली आहे. प्रत्येक व्यक्तीची गरज वेगवेगळी असते. श्रीमंत व्यक्तीच्या जीवनात आता परदेश यात्रा गरजेच्या झाल्या आहेत. अतिश्रीमंतलाेक जास्त करून व्यक्तिगत आणि विशेषतः त्यांच्यासाठी बनविलेली ट्रिप पसंत करतात.
सगळ्यात अधिक मागणी इंग्लंड, फ्रान्समधील राजमहाल सारख्या ऐतिहासिक प्राॅपर्टीजमध्ये राहण्याची आहे.दुबई आणि फिजीमध्ये पाण्याखालील हाॅटेलमध्ये राहणे, मालदीव किंवा कॅरेबियनमध्ये प्राइव्हेट आइसलँड भाड्याने घेणे, आइसलँडिक ज्वालामुखीच्या आत लंच, डिनर करणे, जगातील सगळ्यात महाग रेस्टाॅरेंटमध्ये 20 काेर्स डिनरचा आनंद घेणे, असे खास अनुभव लाेकांना आवडत आहेत.ट्रॅव्हल इंडस्ट्रीशी संलग्न लाेकांनी सांगितले, की ल्नझरी ट्रॅव्हल आता केवळ फाइव्ह स्टार सुविधांपर्यंत सीमित राहिलेले नाही, तर त्यामध्ये वेगळेपणा आणि आयुष्यातील एकदाच घेतला जाणारा अनुभव याला जास्त महत्त्व देण्यात येत आहे. अतिश्रीमंत लाेक अशा काेणत्याही अनुभवासाठी गरजेपेक्षा खूप जास्त प्रीमियम द्यायला तयार आहेत. असे अनुभव जे आयुष्यात परत मिळणार नाहीत किंवा दुसऱ्यांदा घेता येणार नाहीत, असे अनुभव लाेकांना घ्यायचे असतात. श्रीमंतांमध्ये वाढणारी ही इच्छा जगभरात शानदार आणि विशिष्ट अनुभव घेण्याचे वाढलेले महत्त्व स्पष्ट करतात.