माेबाइल अभियंता अभिमन्यू (नाव बदलले) यांनी ‘झाेपेचा शाेध’ या अंतर्गत किमान झाेप मिळवण्यासाठी, एक वर्ष खूप प्रयत्न केले. झाेप, त्यांच्यासाठी केवळ चैन नसून एक मूलभूत गरज आहे, असे त्यांचे ठाम मत आहे.नागदेव, (वय 36 वर्षे) साध्या शांत झाेपेसाठी खरच मेहनत घेत आहेत. दिल्लीत राहणारे नागदेव झाेपेवर लक्ष ठेवण्यासाठी ‘एअर क्वालिटी माॅनिटर’ वापरतात आणि झाेपेच्या आधी काही साउंडट्रॅक्सचा उपयाेग करतात. त्यांनी आपल्या रुटीनमध्ये बदल केला, झाेपण्याआधी अत्तरांचा वापर करून पाहिला, दिवे बंद केले आणि बेडरूममध्ये गडद पडदेही लावून पाहिले.‘मला फाेन माझ्यापासून लांब ठेवता येत नाही.हेच खरे कारण आहे, ते म्हणतात. हे सगळे मुंबईमध्ये गरजेचे आहे. फाेन सायलंट केल्याने जर एखादे काम हातून गेले तर? माझे आईवडील लांब राहतात, त्यांना माझी गरज पडली आणि मी फाेन घेतला नाही, तर ते काय म्हणतील?
एकाच रात्रीत 8 तास सलग झाेप काढायला काेणाला जमते?’ नागदेव म्हणतात.नागदेव यांच्यासारख्या झाेपेच्या अभावाने त्रस्त असणाऱ्या पिढीची ही कथा आहे. ते दिवसभर काम करत असतात, त्यांना पद - पगार जास्त मिळताे, सुविधाही मिळतात परंतु झाेप हळूहळू कमी हाेते, जास्तीत जास्त 5 तास झाेपेला वेळ मिळताे आणि तीही अनिश्चित असते. कित्येक वेळा त्यांना झाेप लागण्यासाठी औषधे घ्यावी लागतात.नागदेवला एका रिट्रीटबदल माहिती मिळाली. त्या रिट्रीटमध्ये शरीर, मेंदू व मनाच्या सवयींवर काम केले जाते. झाेपेसाठी अमेरिकेत शिबिरे असतात, हे ऐकून त्यांना धक्का बसला हाेता. आता मात्र ते एका 10 दिवसीय ‘स्लीप फाेकस्ड वेलनेस रिट्रीट’मध्ये सहभागी झाले, जे दिल्लीपासून सुमारे 500 किलाेमीटर अंतरावर हाेते. या कार्यक्रमासाठी नागराज यांनी 1.5 लाख रुपये भरले, एवढ्याच अपेक्षेने की त्यांना गाढ झाेप लागावी व सकाळी उठल्यावर उत्साही वाटावे.
झाेपेची माेठी समस्या : अनेक वर्षांपूर्वी, झाेपेचा त्रास वृद्ध व्यक्तींना हाेत असे. पण आता 20 ते 40 वयाेगटातील लाेकांनाही झाेपेचे विकार जाणवतात. भारतात, रेसमेड संस्थेच्या अभ्यासानुसार, 30% पेक्षा अधिक भारतीयांना झाेप न लागणे, तुटक झाेप आणि थकवा याचा त्रास हाेत आहे. फक्त 2% नागरिकांनाच 8 तास पूर्ण आणि शांत झाेप लागते. दहा देशांच्या नागरिकांचे सर्वेक्षण केल्यावर झाेप नियमित नसणाऱ्यांना अनेक शारीरिक व्याधी दिसून आल्या. हृदयाचे विकार, हाॅर्माेन्सचे असंतुलन, मनाचे आणि विचारांचे असंतुलन, हे त्रास त्यांच्यात दिसून आले. अनेक लाेक आता झाेपेसाठी अॅप्स, स्मार्टवाॅच, गॅजेट वापरतात. झाेपेचा वेळ, गुणवत्ता आणि हृदयाचे ठाेकेही माेजतात आणि झाेपेचे उपाय शाेधतात. झाेपेच्या या समस्येमुळे वेलनेस इंडस्ट्रीमध्ये झाेपेशी संबंधित उपायांची मागणी वाढली आहे.
झाेपेसाठी झगडणारी ही पिढी थकलेली आहे आणि साॅफ्ट म्युझिक, आरामदायक गाद्या, मंद प्रकाश अशा झाेपेच्या साधनांचाही त्यांना उपयाेग हाेत नाही. बहुसंख्य तरुण पिढी 8 ते 10 तास स्क्रीनसमाेर असते.यामुळे, त्यांच्या मेंदूवर थेट परिणाम हाेताे आणि झाेपेचा नैसर्गिक वेळही जाताे. भारतातील 70% जनतेची ताणाची पातळी जास्त आहे, काम- आराम संतुलन (वर्क-लाईफ बॅलन्स) त्यांना जमत नाही, समाजाच्या अपेक्षांना ते बळी पडतात, त्यांना झाेपेची गंभीर समस्या आहे.गाढ झाेपेचे स्वप्न: पर्यटकांच्या झाेपेच्या साेयींसाठी सध्या हिमालयाच्या कुशीत किंवा समुद्रकिनाऱ्यावर वेलनेस रिट्रीट्स घेतले जात आहेत. स्लीप थेरपी (झाेपेसाठी उपचार), माईंडफुलनेस (जागरूकता), ब्रीदिंग एक्सरसाइज (श्वसनाचे व्यायाम), डार्क रूम (शांत खाेल्या), डिजिटल डिटाॅक्स (उपकरणांपासून लांब) यांचा वापर हाेताे. अशाच स्लीप रिट्रीटमध्ये सहभागी झालेले नागदेव सांगतात, ‘इथे माेबाइल वापरण्यावर बंदी आहे.
फक्त मंद प्रकाश, दरवळणारा गंध आणि शांततेची साथ आहे. यामुळे, झाेप हळूहळू आपाेआप येते.’ ‘काेविड महामारी नंतरच्या काळात पर्यावरणातील आणि मानसिक स्तरावरील बदल झाेपेच्या आराेग्यावर गंभीर परिणाम करत आहेत. लाॅकडाऊनदरम्यान आमचे संपूर्ण रुटीन काेलमडून गेले. तेव्हापासून रात्रीची झाेपेची सवय बदलली आणि आता झाेपण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात,’ शिवानी मेहता (आयटी प्राेफेशनल) सांगते.बरेच झाेपेचे विश्लेषक मानतात, की झाेपेच्या समस्येचा संबंध केवळ मानसिकतेशी नसून, आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशीही आहे.‘शहरी भागातील वायू प्रदूषण, कृत्रिम दिव्यांचे प्रकाश, सतत माेबाइल आणि स्क्रीनचा वापर व गाेंगाट - हे सर्व झाेपेच्या नैसर्गिक चक्रात व्यत्यय आणतात,’ डाॅ. चंद्रिका गुडपती म्हणतात.
त्यांच्या रुग्णांमध्ये अमेरिकेतील, जर्मनीतील, यूकेमधील रुग्णांचाही समावेश आहे आणि सर्वच ठिकाणी ‘डिजिटल डिटाॅक्स’ झाेपेसाठी एक गरज बनली आहे. ‘झाेप ही आता चैन नाही; ती एक वैद्यकीय समस्या बनत चालली आहे,’ डाॅ. चंद्रिका.
झाेपेची उत्तरे शाेधताना : झाेप न येणे, ही आता सामान्य समस्या मानली जाऊ लागली आहे.देशात 30 ते 50 वयाेगटातील सुमारे 70% लाेक झाेपेसंबंधी माहिती इंटरनेटवर शाेधतात आणि अॅराेमा थेरपी, आयुर्वेद, रूटीन डाएट, स्लीप अॅप्स अशा अनेक उपायांचा वापर करतात.‘मी आता दरराेज रात्री स्लीप स्पिरिच्युअल ठरवले आहे - मंद आवाजातील संगीत, अत्तर, गडद प्रकाश आणि झाेपण्याआधी माेबाइलपासून दूर राहणे,’ मुंबईच्या 42 वर्षीय प्राजक्ता सांगतात.‘माझ्यासाठी झाेप म्हणजे नुसती विश्रांती नाही, ताे एक महत्त्वाचा उपचार आहे. मी आपल्या बेडरूममध्ये नैसर्गिक सुगंधी काठ्या, हळुवार संगीत आणि शांत प्रकाशाचा वापर सुरू केला आहे. या वातावरणामुळे मन शांत राहते आणि झाेप लवकर लागते,’ इंटीरिअर डिझायनर प्रमिका एल.
व्यवसायामध्ये बदल व तंत्रज्ञान : हाॅटेल आणि रिसाॅर्ट आता ‘स्लीप फ्रेंडली’ रूम्स देऊ करत आहेत.यामध्ये, नैसर्गिक वाटणाऱ्या गाद्या, मंद प्रकाश, वेलनेस प्राेग्राम व तणावमुक्त करणाऱ्या वनस्पती, यांचा वापर हाेताे. ताज वेलनेस रिट्रीट्स, आनंद इन द हिमालयाज, ध्यान वेलनेस सेंटर यासारख्या केंद्रांमध्ये, झाेपेला प्राधान्य देणाऱ्या सेवा देण्यात येत आहेत. काही रुग्णालये आणि थेरपी सेंटर झाेपेचे रेकाॅर्डिंग, ब्रेनवेव्ह स्कॅनिंग आणि स्लीप मॅपिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करतात.
यामुळे झाेपेच्या दाेषांचे अचूक निदान हाेते आणि त्या आधारावर थेट उपाय सुचवले जातात.