ओशाे - गीता-दर्शन

23 Jul 2025 21:58:43
 

Osho 
जी व्य्नती आपण इंद्रियांच्या पार असल्याचे जाणून घेते, ती व्य्नती आपण निसर्गाच्या पार असल्याचेही जाणून घेते. ती व्य्नती निसर्गाच्या पाशातून आणि जाळ्यातून बाहेर पडते.मग जेवण तर चालूच राहील.पण, कामवासना नाहीशी हाेईल. आपल्या गरजांमध्येही फरक आहे, हे मी सांगताे.ज्या व्य्नतीची इंद्रियास्नती संपून जाईल तिची भूक शुद्ध हाेऊन सीमित व नैसर्गिक अशी हाेऊन जाईल. त्या व्य्नतीची कामवासना शुद्ध हाेऊन रामाकडे ताेंड करून त्या दिशेला गतिमान हाेईल. तिची कामवासना विलीन हाेऊन जाईल. कारण ती निसर्गाची गरज आहे, व्य्नतीची गरज नाहीये. आपण मरण्याआधी निसर्ग एवढे काम आपणाकडून करून घेऊ पाहताे-की आपण आपली जागा घेण्यासाठी कुणालातरी निर्माण करावे. बस्स. त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही.
 
खाेलवर पाहिले तर ती आपली गरज अजिबात नाही. पण, इंद्रियांनी भरकटलेला माणूस बराेबर याच्या उलट विचार करील, ताे एखाद्या वेळी उपाशी राहायला तयार हाेईल पण कामाबाबत थांबायला राजी हाेणार नाही. ताे भूक साेडील. धन साेडील, स्वास्थ्यही साेडील; पण कामवासनेच्या मागे लागलेलाच राहील. हा सारा इंद्रिये विकृत झाल्याचा परिणाम आहे. जसजशी इंद्रिये स्वाभाविक हाेतील, सुकृत हाेतील. सहज हाेतील तसतशा व्य्नतीच्या ज्या-ज्या गरजा आहेत त्या-त्या सरळ हाेत जातील आणि ज्या व्य्नतीच्या गरजा नाहीत त्या नाहीशा हाेऊन जातील. अशा व्य्नतीच्या कर्माचे काय हाेईल? त्याची कर्माबद्दल जी आस्नती हाेती ती नाहीशी हाेईल. पण, कर्म बंद हाेणार नाही. आणि जेव्हा कर्माबद्दलची आस्नती नाहीशी हाेईल तेव्हा चुकीची कर्मे रामराम म्हणतील आणि जी रास्त कर्मे आहेत ती माेठ्या ऊर्जेने सक्रिय हाेतील.
Powered By Sangraha 9.0