अर्जुनाची समजूत काढताना भगवंत सार्वत्रिक सत्य तत्त्व अर्जुनाला समजावून सांगत आहेत. शाेक, आनंद, सुख, दु:ख, आशानिराशा या सर्वांच्या मूलस्थानाकडे अर्जुनाचे चित्त ते वेधीत आहेत.ते असे सांगतात की, ‘अर्जुना, आपल्या शरीराचे पहा की, ते एकच असले तरी वयाच्या भेदाने वेगळे वाटते.बालपण, तारुण्य या दशांत देह ताेच असताे, त्याचप्रमाणे चैतन्यशक्तीवर हा देह निर्माण हाेताे, आणि शेवटी ताे विलीन हाेताे. हे ज्याने जाणले त्याला सुखदु:ख हाेणार नाही. ‘पण अर्जुना, हे महत्त्वाचे तत्त्व लाेक कां जाणीत नाहीत? याचे कारण असे की, इंद्रियांच्या स्वाधीन झाल्यामुळे त्यांच्या चित्तास भ्रम हाेताे. इंद्रिये विषयांचे सेवन करीत असताना काेठे सुख हाेते तर काेठे दु:ख हाेते आणि याचा अनुभव आपण इंद्रियांच्या स्वाधीन असल्याकारणाने आपणांस येताे.
खरे पाहता सुखच मिळेल अथवा दु:ख मिळेल अशी स्थिती नाही. कधी सुख हाेईल तर कधी दु:ख हाेईल. द्वेष व प्रेम यांचेही असेच आहे. मृदुत्व व कठीणपणा हे स्पर्श या विषयाचे गुण आहेत.इंद्रियाधीन असलेल्या आपल्या या चित्तास यांच्या जाणिवेमुळे कधी संताेष तर कधी खेद निर्माण हाेताे.भयंकर व सुंदर हे दाेनही रूपाचे विशेष आहेत. आपण डाेळ्यांच्या सहाय्याने सुखदु:ख भाेगताे, सुगंध व दुर्गंध हे दाेन विषय नाकाच्या द्वारे संताेष व विषाद निर्माण करतात. गाेड व कडूची जाणीव जीभेमुळे आपणांस हाेते. अशा रीतीने विषयांची संगत आत्मरूपाचा विसर पाडते.अर्जुना, म्हणून आपण जेव्हा इंद्रियांच्या स्वाधीन हाेताे, शीत व उष्ण यांचा अनुभव (क्रमशः)