ब्रिटन (युनायटेड किंग्डम/यूके) सरकारने घाेषणा केली, की येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (2029 मध्ये हाेण्याची शक्यता) मतदानाचे वय 18 वरून 16 वर्षांवर आणले जाईल. ही याेजना मागील वर्षी लेबर पक्षाच्या जाहीरनाम्यात मांडण्यात आली हाेती आणि त्याला मतदारांनी पाठिंबा दिला हाेता. संपूर्ण यूकेमध्ये स्काॅटलंड आणि वेल्सप्रमाणेच निवडणुका घेण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे. ब्रिटिश सरकारच्या मते, हा पुढाकार या पिढीत ब्रिटनच्या लाेकशाहीमध्ये घडणाऱ्या सर्वात माेठ्या बदलांपैकी एक आहे. या याेजनांमध्ये मतदार ओळख पद्धतीचा विस्तार करून ब्रिटनमध्ये जारी करण्यात येणाऱ्या बँकेच्या ओळख कार्डांना मतदान केंद्रावर वैध ओळखपत्र म्हणून मान्यता देण्याचाही समावेश आहे. यामुळे खात्री करणे शक्य हाेईल, की मतदार हे मतदान करण्याच्या संधी पासून दूर राहत नाहीत.
ब्रिटनचे उपपंतप्रधान म्हणाले, ‘बरीच वर्षे झाली नागरिकांचा लाेकशाहीवरचा विश्वास संपत चालला हाेता. लाेकांचा लाेकशाही व्यवस्थेवरील (निवडणूक) विश्वास आणि संस्थांवरील श्रद्धा खालावत चालली हाेती. त्यामुळे हे बदल आवश्यक झाले आहेत.’ पंतप्रधान एंजेला रेनर यांनी, वय कमी करण्यासाठीचा आराखडा सादर केला आणि सांगितले, ‘आम्ही आमची लाेकशाही 21व्या शतकासाठी आधुनिक व सशक्त करत आहाेत. 16 आणि 17 वर्षांच्या तरुणांना मतदानाचा अधिकार देणे हे लाेकांचा लाेकशाहीत सहभाग वाढवण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल आहे. आपण लाेकशाही व्यवस्थेला गृहीत धरू नये. तिचे रक्षण करत लाेकांचा सहभाग वाढवणे हे आपल्या भावी पिढ्यांसाठी समाज अधिक सुरक्षित आणि प्रभावी करेल.’ हे सर्व बदल येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी संसदेत सादर केले जाणार आहेत.