जे लाेक शरीरशास्त्राचा अभ्यास करतात, त्यांचे असे म्हणणे आहे की भूक नसतानाही बहुतेक लाेक जेवण घेतात आणि मग याचमुळे हजाराे प्रकारची आजारपणे उद्भवतात. जेवायची वेळ झाली, म्हणून लाेक जेवून घेतात. चला जेवून घेऊ या! चांगले लागतंय, स्वादिष्टआहे म्हणून खातात, पाेटात आणखी आणखी टाकत जातात. भुकेची वाट पाहण्याची कधी ते काळजीच करीत नसतात.आपल्या जेवणाचा संबंध भुकेशी काही राहिलेलाच नाही. जेवण हा एक मनाेविलास हाेऊन बसला आहे. भूक ही एक शारीरिकआवश्यकता आहे. ती एक गरज आहे.पण आaता जेवण एक वासना झाले आहे. आपण जेवणात भुकेव्यतिर्नितही अनेक प्रकारचे स्वारस्य रस निर्माण करून ठेवले आहेत. इंद्रियाच्या आस्नतीतून निर्माण हाेते.असे सर्वच दिशांनी झाले आहे. कामवासनेच्या बाबतीतही असे झाले आहे. जनावरेही याबाबत आपणापेक्षा जास्त संयत व्यवहार करतात. ती पिरिऑडीकल ऋतुचक्राधीन आहेत.
एक ऋतु असताे, तेव्हाच पशू कामातुर हाेताे.
पण मनुष्य हे पृथ्वीवरचे असे एकच पशू आहे की जे चाेवीस तास, वर्षभर कामातुर असते, चाेवीसतास, पशू कामातुर झाला की, मादी नराला वा नर मादीला शाेधतात. पण माणसाचे वेगळेच झाले आहे. त्याला स्त्री दिसाे वा पुरुष ताे कामातुर हाेताेच. या उलट पशूंमध्ये आधी कामातुरता येते आणि मग शाेध सुरू हाेताे. पण माणसाच्या बाबतीत मात्र याच्या बराेबर उलट आहे. त्याला विषय दिसला, की ताे लगेचच कामातुर हाेताे. माझे एक मित्र माेठे शिकारी आहेत. त्यांनी कित्येक वाघ-सिंहांच्या शिकारी केल्यात. त्यांच्या घरी मी पाहुणा हाेताे. मी त्यांना विचारले, कधी आपण एखाद्या वाघाला अथवा सिंहाला त्याचे जेवण झाल्यावर, पुन्हा जेवणासाठी उत्सुक असे पाहिले का? त्यांनी म्हटले, ‘नाही. कधीच नाही.’ आम्ही जेवण करीत हाेताे, आणि त्यांचे जेवण बघून मी हा प्रश्न त्यांना विचारला हाेता. त्यांच्या खाण्याची गाडी एकदा सुटली ती बराच वेळ भरधाव चालूच राहिली. पण तरीदेखील माझ्या विचारण्याचा राेख काही त्यांच्या लक्षात आला नाही. त्यांनी विचारले, ‘हे आपण कशासाठी विचारता आहात?’ मी त्यांना म्हटले- मी यासाठी विचारत आहे की आपले जेवण जरूरीपुरते हाेऊन तर बराच वेळ झाला