लाेहचुंबकात दाेन गाेष्टी असतात.एक लाेखंड जे दिसते आणि दुसरे त्याच्या आजूबाजूचे मॅग्नेटिक फिल्ड जे दिसून येत नाही. या गाेष्टीला जीवनात येणाऱ्या समस्यांशी जाेडून पाहा. समस्या तर जीवनात येतच असतात. एक साेडविली तर दुसरी येईल. आता हे पाहू की, जेव्हा समस्या येतील तेव्हा कशी स्थिती असेल आणि त्यावर मात कशी करता येईल? समस्येच्या काळात आपल्या बराेबर तीन बाबी हाेतील. एक, आपण त्रासलेले असताे. दाेन, आपण भयभीत हाेताे; आणि तीन, आपण स्वत:ला एकटे असल्याचे समजताे.म्हणूनच दुसऱ्यांचा आधार शाेधताे.तीनही स्थितीत एकतर आपण गाेंधळून जाताे किंवा नैराश्यात बुडून एखादे आत्मघाती पाऊल उचलताे. म्हणून जेव्हा समस्या येतात, तेव्हा दाेन कामे करा. पहिले समस्येपासून थाेडे दूर व्हा. इथे दूर हाेण्याचा अर्थ दूर पळणे असा नाही तर विसरणे असा आहे.
काही वेळापुरते विसरून जा की, तुम्ही एखाद्या समस्येमुळे त्रासलेले आहात. जसे ट्रॅफिकमधून जाताना दुसऱ्यांना जाण्यासाठजागा देता, याचा अर्थ हा नाही की, आपण चालणे बंद केले. तिथे जेव्हा बाजूला हाेताे किंवा थांबताे ती आपल्या चालण्याचीच पद्धत असते. असेच समस्येच्या वेळी थाेडे बाजूला व्हा; आणि तिला दुरून पाहा.दुसरे काम करा, जेव्हा समस्याग्रस्त असाल, तेव्हा दुसऱ्यांच्या मदतीसाठी पुढे या. त्यामुळे आपल्या आतील ऊर्जा इतर लाेकांच्या दिशेने वाहू लागते. त्यामुळे आपण स्वत:पासून दूर हाेताे. अशा वेळी आपल्या आत अशी भावना जागृत हाेईल की, आपली समस्या दूर हाेत नसली तरी दुसऱ्यांना मदत तर करीत आहाेत? हळू हळू तुम्ही त्यांच्यासाठी माैल्यवान व्हाल; आणि जेव्हा दुसऱ्यांसाठी व्हाल, तर स्वत:साठीही माैल्यवान व्हाल. माैल्यवान याचा अर्थ आहे, आत्मबलाने, आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. म्हणून जेव्हा कधी समस्या येईल, ही दाेन कामे करा, सुलभपणे समस्येतून पलीकडे जाल.