चाॅकलेट बाॅक्समधून साेळा साप निघाले!

02 Jul 2025 16:50:55
 


snakes
 
 
 
मुंबई विमानतळावर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे तमिळनाडूतील एका तरुणाला चाॅकलेट बाॅक्समध्ये लपवून ठेवलेले विदेशी व दुर्मीळ साप तस्करी करताना पकडण्यात आले. आराेपीचे नाव गुडमन लिनफाेर्ड लिओ असे आहे. ताे तब्बल 16 विदेशी प्रजातींचे साप तस्करी करण्याचा प्रयत्न करत हाेता. तपासादरम्यान कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला सापासह अटक केली.माहितीनुसार, ही घटना 27 जून राेजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची आहे. आराेपी ग्रीन चॅनेलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत हाेता. परंतु विमानतळ अधिकाऱ्यांना त्याच्या वर्तनाचा संशय आल्यानंतर त्याच्या चेक- इन बॅगची तपासणी करण्यात आली. शाेधादरम्यान चाॅकलेट बाॅक्स व जुन्या कपड्यांमध्ये 15 पांढऱ्या कापडी पिशव्यांमध्ये साप लपवलेले आढळले.
 
जप्त केलेल्या प्रजाती : 5 अल्बिनाे हाेंडुरन साप, 2 गार्टर साप, 2 कॅन्यन सँड बाेअस, 1 कॅलिफाेर्निया किंग साप, 5 गेंडू उंदीर साप, 1 अल्बिनाे साप.चाैकशी दरम्यान, आराेपीने कबूल केले, की ताे हे दुर्मीळ साप बाजारात विकून लाखाे रुपये कमवण्याचा विचार करत हाेता. जप्त केलेल्या प्रजाती उखढएड च्या यादीत नसल्या, तरी वैध कागदपत्रांशिवाय त्यांची आयात भारतात बेकायदेशीर आहे.
Powered By Sangraha 9.0