मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना’

02 Jul 2025 17:05:49
 

maval 
 
मावळ तालुक्यात प्रथमच मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली असून, अध्यक्षपदी सुदेश गिरमे, कार्याध्यक्षपदी विशाल विकारी, तर सचिवपदी रामदास वाडेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जाेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या नव्या संघटनेची स्थापना आणि पदग्रहण समारंभ पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.यानंतर पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची अधिकृत घाेषणा करण्यात आली.यावेळी राज्य पत्रकार संघाचे अध्यक्षकिरण जाेशी, सचिव शिबू नायर, पुणे शहराध्यक्ष पंकज बिबवे, ‘लाेकमत’चे उपसंपादक याेगेश माडगूळकर, ज्येष्ठ पत्रकार साेनबा गाेपाळे, बबनराव भसे, ज्ञानेश्वर वाघमारे, विलास भेगडे, निखिल कवीश्वर, अतुल पवार, रेश्मा फडतरे, विशाल पाडाळे, चेतन वाघमारे यांच्यासह तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित हाेते.
 
या नव्याने स्थापन झालेल्या संघात लाेणावळा, कामशेत, मावळ ग्रामीण, तळेगाव, तळेगाव प्रेस फाउंडेशन व देहूराेड पत्रकार संघाचे सर्व सदस्य समाविष्ट करण्यात आले आहेत. मावळ तालुक्याच्या इतिहासात प्रथमच तालुका पातळीवर सर्वव्यापी अशी संघटना उभी राहत असून, पत्रकारांच्या विविध मागण्या व समस्यांबाबत सक्रियपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.राज्य अध्यक्ष किरण जाेशी यांनी संघाची उद्दिष्टे, उपक्रम यासंदर्भात माहिती दिली.त्यांनी सांगितले की, हा संघ पुणे-मुंबई शहराच्या धर्तीवर कार्यरत राहणार असून, पत्रकारांसाठी निवास, आराेग्य सेवा, शैक्षणिक उपक्रमांचा देखील समावेश केला जाणार आहे.नवीन संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे यांनी पत्रकार संघाला राज्यस्तरीय व्यासप
Powered By Sangraha 9.0