पालन हे सार्वजनिक आराेग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्याचे सांगून पॅकेज्ड ड्रिंकिंग वाॅटर युनिट्सची 100 टक्के तपासणी सुनिश्चित करण्याची सूचना राव यांनी दिली. ‘ईट राईट इंडिया’ उपक्रमांतर्गत राज्यात या विभागामार्फत राबवण्यात आलेल्या रस्त्यावरच्या खाद्य विक्रेत्यांच्या तपासणी माेहिमांचे राव यांनी विशेष काैतुक करून अंगणवाडी सेविका व स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अन्न सुरक्षेच्या जनजागृतीचे अनुकरणीय उदाहरण महाराष्ट्राने निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.
अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आराेग्याचा पाया असून, त्यात काेणतीही कसूर हाेऊ नये यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कटाक्षाने व समन्वयपूर्वक काम करावे, असे निर्देश अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. कमलावर्धन राव यांनी दिले.कमलावर्धन राव यांनी राज्यातील अन्न सुरक्षा अंमलबजावणीचा नुकताच आढावा घेतला. अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे व काेकण विभागातील सह आयुक्त (अन्न), परवाना प्राधिकारी, न्यायनिर्णय अधिकारी, तसेच पश्चिम विभागीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण संचालक प्रीती चाैधरी यांच्यासह केंद्र व राज्य सरकारच्या विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.अन्न सुरक्षेच्या उच्चतम मानकांचे