राजेश कुमार यांनी स्वीकारला मुख्य सचिव कार्यभार

    02-Jul-2025
Total Views |
 

chief 
 
शासनाने राज्याच्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियु्नती केली आहे.मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता साैनिक यांच्याकडून त्यांनी 49 वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या याेजनांना अधिक गती देऊन सर्वसामान्यांना आपल्या कामांसाठी मंत्रालयापर्यंत येण्याचीआवश्यकता भासू नये यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.राजेश कुमार 25 ऑगस्ट 1988 राेजी भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. मूळचे राजस्थानमधील सवाई माधाेपूर येथील असलेले राजेश कुमार यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. साेलापूर येथे अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी पदापासून 24 जुलै 1989 राेजी आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली.
 
त्यानंतर सातारा येथे सहायक जिल्हाधिकारी, बीड जिल्हा परिषदेचमुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावतीत आदिवासी विकास अपर आयु्नत, धाराशीव व जळगावचे जिल्हाधिकारी, साेलापूरचे आयु्नत, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्र्यांचे खासगी सचिव, आदिवासी विकास आयु्नत, नवी मुंबईत एकात्मिक बालविकास आयु्नत, मंत्रालयात पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव, उद्याेग, ऊर्जा व कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, सहकार, पणन व वस्त्राेद्याेग विभागाचे अपर मुख्य सचिव; तसेच महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव आदी महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी काम केले आहे.