गडचिराेलीतील शाळांत भिंतीवर पुस्तकालय

    02-Jul-2025
Total Views |
 
 

School 
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी; तसेच त्यांच्यात राष्ट्रीयतेची भावना आणि जिज्ञासा वाढीस लागावी, या उद्देशाने राज्य शासन विविध उपक्रम राबवत आहे.याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गडचिराेली जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक कथा वाचण्याची संधी देत एक हजार शाळांत भिंतीवरील पुस्तकालय प्रकल्प साकारण्यात येत आहे. रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून 50 हजार पुस्तके उपलब्ध करून देण्याचा हा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात येत आहे. सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ हाेईल.‘स्वप्नाेंका पिटारा’ हे या ट्रस्टचे भिंतीवर लावता येणारे छाेटे पुस्तकालय आहे.
 
दुर्गम भागातील शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे.प्रत्येक पुस्तकालयात विज्ञान आणि अंतराळ संशाेधनातील अद्भुत गाेष्टी, जीवनमूल्य, नेतृत्व, लाेककथा, स्वातंत्र्यसैनिक आणि शूर सैनिकांच्या कथा, पुराणकथा, कल्पनारम्य जग आदी विषयांवर आधारित सुमारे 50 रंगीत, काळजीपूर्वक निवडलेली मराठी आणि इंग्रजीतील दर्जेदार कथा पुस्तके असून, हा उपक्रम मुलांच्या वाचनाला आनंददायी बनवताे. या माध्यमातून वर्गखाेल्यांना प्रेरणादायी, कल्पनाश्नतीला चालना देणाऱ्या आणि विचारक्षम शैक्षणिक जागांत रूपांतरित करणाऱ्या बनवण्याचा आणि वाचनचळवळ उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे.