देशात तांदळाच्या साठवणुकीसाठी जागा अपुरी पडत आहे

02 Jul 2025 16:54:54
 

Rice 
 
यावर्षी, देशाचा तांदळाचा साठा गेल्या 20 वर्षांतील सर्वाधिक आहे.तांदळाचेच आणखी एक विक्रमी उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे.सरकार समाेरील सर्वात माेठे आव्हान म्हणजे, एवढे उत्पादन साठवून ठेवण्यासाठी जागा कमी पडू शकते.जगातील, वार्षिक 10% तांदळाची उत्पादन क्षमता आणि साठा सध्या देशात आहे. या वर्षी चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे पुन्हा भरघाेस उत्पादन हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे, तांदळाची साठवण आणि व्यवस्थापन हे सरकारच्या समाेरचे माेठे आव्हान ठरत आहे. उघड्या गाेदामात तांदूळ साठवण्याची वेळ आली तर ताे खराब हाेण्याचा धाेका आहे.संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषितज्ज्ञ शर्ली मुस्तफा म्हणतात, ‘भारताचे उत्पादन तांदळाच्या गरजेशी अनुकूल असून, 2025-2026 मध्ये देखील एक माेठा हंगाम येईल अशी शक्यता आहे.
 
नवीन पीक सप्टेंबर-ऑक्टाेबर दरम्यान बाजारात येईल आणि त्यामुळे सरकारच्या साठा करण्याच्या क्षमतेवरचा दबाव वाढेल.’ भारत, हा जगातील तांदूळ निर्यात करणारा सर्वात माेठा देश आहे.सरकारच्या निर्यात धाेरणामुळे, आंतरराष्ट्रीय बाजारातील तांदळाच्या किमती वाढण्यास मदत झाली. परंतु, देशात साठा सातत्याने वाढतच असल्याने मागणी त्या तुलनेत वाढलेली नाही आणि त्यामुळे किमतीवर परिणाम हाेईल, असा अंदाज आहे.जगातील एकूण तांदळाचा साठा यंदा, पाच वर्षांतील सर्वात जास्त असेल, असाही अंदाज आहे. दक्षिण आशियात, 20 जूनपर्यंत तांदळाच्या लागवडीचे क्षेत्र 58% ने वाढले आहे. देशातही ऑगस्टच्या मध्यापर्यंत पेरणी पूर्ण हाेईल, असे कृषी मंत्रालयाचे म्हणणे आहे.
 
‘भारताचा, तांदळाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर माेठा प्रभाव आहे.मात्र, आपल्याला हेही पाहावे लागेल की प्रतिस्पर्धी देशांचा उत्पादनाचा दर्जा व तांदळाच्या प्रमुख खरेदीदारांची मागणी यांची सांगड कशी घालायची,’ असे मुस्तफा यांनी सांगितले.फूड काॅर्पाेरेशन ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, सध्या देशात 3.9 काेटी टन धान्याचा साठा आहे, तर प्रक्रिया न झालेला धान्यसाठा 3.2 काेटी टन आहे, ज्यातील 2.3 काेटी टन तांदूळ आहे. हे धान्य, विविध कल्याणकारी याेजनांसाठी वापरले जाते, गरजूंसाठी दरमहा 5 किलाे माेफत धान्यवाटप केले जाते. सरकारने 24 लाख टन तांदळाचा वापर इथेनाॅल उत्पादनासाठी करण्यास मान्यता दिली आहे. हे साठा कमी करण्यासाठी एक वेगळे व धाडसी पाऊल मानले जात आहे.
Powered By Sangraha 9.0