कुमारसाठी (वय 31 वर्षे) रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या कामाच्या वेळा, तणावग्रस्त जीवनशैली आणि त्यावर ‘रिलीफ’ म्हणून घेतलेले ड्रिंक, हे सगळे एक दिवस हृदयविकाराचा झटका म्हणून समाेर आले.रविवारी अचानक छातीत दुखणे सुरू झाल्यावर डाॅक्टरांनी दिलेल्या सूचनेनुसार, आता कुमारने फास्ट फूड पूर्णपणे बंद केले असून, व्यायाम सुरू केला आहे. कुमारचे प्रकरण काही वेगळे नाही. अलीकडे, 20 ते 30 वयाेगटातील तरुणांमध्ये हृदयराेगासाठी रुग्णालयात दाखल हाेण्याचेप्रमाण वाढत आहे. हवेतील प्रदूषण, बसून राहण्याची जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि सततचा ताण यामुळे हृदयराेगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचा इशारा, कार्डिओलाॅजिस्ट्स देत आहेत‘तरुण पिढीतील हे आकडे खूपच चिंताजनक आहेत. 34 वर्षांखालील 10 रुग्णांपैकी 6 जण हृदयविकारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल हाेत आहेत,’ असे डाॅ. नवीन भामरी (मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हाॅस्पिटल) यांनी सांगितले.
‘80 वर्षांच्या पुढील वय असलेल्या वृद्धांपेक्षा तिशीतल्या तरुणांना आज हृदयविकाराच्या शस्त्रक्रियांची अधिक गरज भासत आहे,’ असे डाॅ.निखिल शहा (वाेकार्ड हाॅस्पिटल) यांनी नमूद केले.या समस्येमागची कारणे डाॅक्टरांनी वेळाेवेळी स्पष्ट केली आहेत - व्यायामाचा अभाव, सततचा ताण, निद्रानाश, तळलेले पदार्थ, धूम्रपान, अल्काेहाेल, साखरेचे जास्त सेवन आणि आनुवंशिकता.भारतातील अनेक कर्मचारी सततच्या तणावात आणि अपूर्ण झाेपेमुळे हृदयविकाराच्या उंबरठ्यावर पाेहाेचले आहेत. काेविडनंतर हे प्रमाण अधिकच वाढले आहे. काेविड झालेल्या लाेकांनी हृदयाची तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे,’ असे डाॅ.नरेश त्रेहन सांगतात.भारतात डायबेटीस, बीपी आणि आनुवंशिकतेने हृदयराेगांचा त्रास लवकर सुरू हाेताे, त्यामुळे भारतातील तरुणांमध्ये हृदयविकार पाश्चिमात्य जनतेपेक्षा 10 ते 15 वर्षे लवकर सुरू हाेतात, असे इंडियन हार्ट असाेसिएशनच्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.