गुरू अंत:करण जागृत करणारा शक्तिस्राेत

02 Jul 2025 22:20:37
 

Guru 
 
‘गुरुचरित्र म्हणजे केवळ ग्रंथ नाही, तर संपूर्ण जीवनाचे मार्गदर्शन आहे. गुरू म्हणजे फ्नत ग्रंथ शिकवणारा नाही, तर अंत:करण जागृत करणारा शक्तिस्राेत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास स्वामींनी दाखवलेली गुरुभ्नती हेच गुरुपाैर्णिमेचे सार आहे,’ असे मत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीच्या पहिल्या महिला विश्वस्त अ‍ॅड. डाॅ.राेहिणी पवार यांनी व्य्नत केले.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे गुरुपाैर्णिमा सप्ताहाचा प्रारंभ श्री दत्तमंदिर प्रांगणात झाला.यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम-जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे, काेषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सवप्रमुख महेंद्र पिसाळ, विश्वस्त सुनील रुकारी, राजेंद्र बलकवडे, अंजली काळकर आदी उपस्थित हाेते. उत्सवाचे यंदा 128वे वर्ष आहे.
 
बाल कल्याण संस्थेच्या वतीने ‘गंध फुलांचा’ हा दिव्यांग मुलांचा संगीतमय कार्यक्रम यावेळी सादर झाला. चैतन्य सिंदाळकर, साकेत देऊचके, साेनल कदम, श्लाेक चावीर, श्रेयस जगदाळे, प्रकाश माळी, सिद्धी कुंजीर यांना संगीत शिक्षक दत्तात्रय भावे, वाद्य शिक्षक संजीव हेबाळे, गायन शिक्षक संकेत लाेहकरे यांनी साथ दिली. अ‍ॅड. कदम- जहागिरदार यांनी यावेळी मनाेगत व्य्नत केले. गुरुपाैर्णिमेनिमित्त 11 जुलैपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. उत्सव काळात वैद्यकीय; तसेच र्नतसंकलन शिबिरांचे आयाेजन केल्याची माहिती ट्रस्टतर्फे देण्यात आली.
Powered By Sangraha 9.0